Ajit Pawar Death News: अजित पवारांच्या अपघाताची बातमी सुनेत्रा पवारांना कशी कळली? ऐकून अंगावर काटा येईल

Ajit Pawar Death News: अजित पवार यांचे निधन झाले आहे, याची माहिती त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना कशी समजली?

जाहिरात
Read Time: 2 mins
"Ajit Pawar Death News: अजित पवारांच्या निधनाची माहिती सुनेत्रा पवारांनी कशी समजली?"
PTI

Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजित पवार (Ajit Pawar Died In Plane Accident) यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. 28 जानेवारी रोजी म्हणजेच बुधवारी अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या धक्क्यातून अनेकजण अजूनही सावरलेले नाहीत. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याच्या अगदी काही क्षणातच सुनेत्रा पवारांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. 

विश्वासच बसत नसल्याने व्हिडीओ कॉल केला

अजित पवारांचे विमान सकाळी 8.50 वाजण्याच्या सुमारास बारामती येथील विमानतळावर लँड होणार होते. त्यामुळे त्यांच्या येण्याची वाट पाहत त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आधीच विमानतळावर पोहोचलेले होते. विमानतळावर आपात्कालीन स्थितीसाठी एक अँम्ब्युलन्सही असते. सकाळी 8.46 वाजण्याच्या सुमारास विमान कोसळत असल्याचे अजित पवारांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाहिले होते. त्यांनी अँम्ब्युलन्ससह तत्काळ अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली होती. तिथलं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. या अपघाताबाबतची माहिती सुनेत्रा पवार यांना देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यालयातील एका व्यक्तीने फोन लावला होता. 

(नक्की वाचा: Sharad Pawar: कृतीतून संदेश देण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा नेमका प्लॅन आहे तरी काय?)

सुनेत्रा पवार हादरल्या

सुनेत्रा पवार यांना कोणीतरी क्रूर थट्टा करत असावं, असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी आपला विश्वास बसत नसल्याचे सांगितलं. यावर फोन करणाऱ्याने व्हिडीओ कॉल लावून बारामती विमानतळावरील परिस्थिती त्यांना दाखवली होती. तिथली दृश्य पाहिल्यानंतर सुनेत्रा पवार हादरल्या होत्या आणि त्यांना तिथेच रडू कोसळलं. ही घटना घडली तेव्हा सुनेत्रा पवार दिल्लीत होत्या, तिथून त्या तातडीने बारामतीच्या दिशेने रवाना झाल्या. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Death: 'ज्यांनी हे पाप केलं असेल, भविष्यात त्यांच्या...' अमोल मिटकरींचा शाप)

सुनेत्रा पवारांकडून विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच गोष्टी वेगाने घडत गेल्या. 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 2 फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जाऊन अजित पवारांसोबत या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

Advertisement