Ajit Pawar Funeral Video: अजित पवार यांचे निधन होऊन पाच दिवस झाले, पण ते या जगात नाहीत; यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीय. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. 29 जानेवारी 2029 रोजी त्यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून समर्थकांनी बारामतीत गर्दी केली होती. हजारो डोळ्यांत एकच प्रश्न होता की हे खरंच घडलं का?. सोशल मीडियावर अजित पवार यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होते. नेटकरीही त्यांचे व्हिडीओ शेअर करून श्रद्धांजली वाहत आहेत.
अजित पवारांचा हा व्हिडीओ पाहताना पाणावतील
अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही एक अतिशय भावुक व्हिडीओ शेअर केलाय. अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या दिवसाचे क्षण या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. जय पवार यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहताना डोळे नकळत पाणावतात. या व्हिडीओमध्ये एक भयाण शांतता, हजारो चेहऱ्यांवर दिसणारी वेदना-दुःख, कार्यकर्त्यांचे ओले डोळे आणि मनात दाटून आलेली पोकळी जाणवतेय. कारण अजित पवारांचा शेवट अशा पद्धतीने होईल, याची कोणीही कधीही कल्पना केलेली नसावी.
जय पवार यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
(नक्की वाचा: Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली नसती तर मायलेकरांना वाळीत टाकलं असतं, कट्टर विरोधकाचा गंभीर आरोप)
रिअल हीरो परत येणार का?
रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, "मनावरून कधीच न पुसणाऱ्या कटू स्मृतीचं प्रतिक बनलेलं हे धूड बारामतीतून चौकशी कामी हलवलं.. ज्याने काळ बनून आमच्या #रिअल_हिरो ला आमच्यातून हिरावून नेलं आणि महाराष्ट्राच्या असंख्य स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी केली…! याची पुढच्या काळात चौकशी होईलही आणि आम्हीही त्यासाठी पाठपुरावा करु पण आमचा रिअल हिरो परत येणार आहे का?
(नक्की वाचा: Parth Pawar News: अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांना राज्यसभेत पाठवण्यासाठी भाजपाचा विरोध? पुण्यातील ही गोष्ट भोवली?)
विमान अपघातात निधन अजित पवारांचे निधनअजित पवार यांचे विमानाच्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे म्हटलंय जातंय. सध्या अपघाताची चौकशी सुरू आहे.