VIDEO: "दादाला 'I Love You' सांग...", अजित पवारांच्या चाहत्याची पार्थ पवारांना भावनिक साद

Ajit pawar Death: अजितदादांचं पार्थिव बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला होता, तिथून एक अत्यंत भावूक व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Ajit Pawar Detah : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झालं. आज 29 जानेवारी रोजी, त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामतीमध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

अजितदादांचं पार्थिव बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला होता, तिथून एक अत्यंत भावूक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक कार्यकर्ता धाय मोकलून रडताना दिसत असून, तो अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना साद घालत आहे.

 VIDEO

(नक्की वाचा-  Ajit Pawar: कामाचा माणूस हरपला! महाराष्ट्राच्या हिताचे अजित पवार यांनी घेतलेले 10 मोठे निर्णय)

व्हायरल व्हिडिओमधील तो क्षण

रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असलेले पार्थ पवार व्यवस्थेची पाहणी करत असताना, एक कार्यकर्ता रडत म्हणतो, "दादाला 'I Love You' म्हण, पार्थ दादा... दादाला 'I Love You' सांग." 

आपल्या नेत्यावरचे हे निस्सीम प्रेम पाहून पार्थ पवारही काही काळ सुन्न झाले. त्यांनी हात उंचावून त्या कार्यकर्त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर गेट बंद करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, 'अजितदादां'बद्दल जनतेच्या मनात किती प्रेम होते, याची साक्ष देत आहे.
 

Advertisement