- अजित पवारांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे
- राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले असून पाठपूरावा करण्याचा आश्वासन दिले आहे
Ajit Pawar plane crash: अजित पवारांच्या विमान अपघातानंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. अजित पवारांचा अपघात की घातपात अशी चर्चा ही सुरू झाली आहे. रोहित पवारांनी तर हा अपघात नाही तर घातपात असल्याची शंका उपस्थित केली होती. काही शक्यता ही त्यांनी वर्तवल्या होत्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी या अपघाताची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. तसे निवेदन ही देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, पार्थ पवार उपस्थित होते.
तटकरे यांनी सांगितले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित दादांचा जो अपघात झाला त्याबाबत आम्ही त्यांना निवेदन दिले. त्यात या अपघाताची सीबीआय चौकशी झाली पाहीजे अशी मागणी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिले आहे. याचा राज्य सरकार म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठपूरावा करू असे त्यांनी सांगितले. या अपघाताची चौकशी सीबीआय मार्फत झालीच पाहीजे हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस लावून धरेल असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून याची चौकशी सुरू झाली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. पण सीबीआय सारख्या स्वायत संस्थेकडूनच याची चौकशी झाली पाहीजे अशी आपली भावना आहे. तसे झाल्यास या अपघाताचा तपास अधिक व्यापक पद्धतीने होवू शकतो. शिवाय त्यांना परदेशातील काही केसची ही मदत यात होवू शकते. वेगवेगळ्या देशात अशा पद्धतीचे अपघात झाले आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. त्यातून काही मदत या स्वायत संस्थांना मिळू शकते असे तटकरे यांनी सांगितले.
काही झालं तरी या अपघाताचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. तो झालाच पाहीजे. शिवाय या अपघातानंतर जे जे मुद्दे उपस्थित झाले त्यांच्यासह तपास झाला पाहीजे. नुसता तपास नको तर तो जलदगतीने होणे गरजेचे आहे. त्याचा निष्कर्ष देशा समोर ठेवला पाहीजे. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमीका आहे असं ही त्यांनी सांगितलं. रोहित पवार यांनी ही अपघाता मागे काय असू शकते याची कल्पना देणारे सादरीकरण केले होते. त्यात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताबाबत संभ्रम निर्माण झाला. आता त्यानंतर तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांना सोबत घेवून या अपघाताच्या तपासाची मागणी केली आहे.