देवा राखुंडे, प्रतिनिधी
Ajit Pawar Plane Crash Latest Update : अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास जलद गतीने व्हावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकरी यांनी केली आहे.अजित पवारांच्या विमान अपघाताचा अँगल हा ईशान्येश्वर मंदिर भोंदू कॅप्टन अशोक खरात आणि त्यांचे भक्त यांचा काही संबंध आहे का,अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि एसआयटी भागाकडे करतो,असं मिटकरी यांनी म्हटलं आहे. बारामतीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी फिरत असताना अनेक गावांमध्ये दौरे केले. त्यावेळी गावकऱ्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास लागावा, अशी मागणी केली होती,असंही अमोल मिटकरी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी तसे बोलून दाखवले सुनेत्रा पवार देखील बोलल्या.हा विषय फास्टट्रॅक वर आला पाहिजे.काही अंधश्रद्धेचे प्रकार देखील काही लोकांनी माझ्यासमोर निदर्शनात आणून दिले.त्यातील एक प्रकार म्हणजे अजित पवारांचा काटेवाडी येथील बंगला..त्या शेजारच्या शेतात एक बोकड झाडाला लटकवून त्याचं मस्तक मारलं होतं.ही पूजा 21 जानेवारीला पहाटे 1 वाजून 23 मिनिटांनी केली होती.ज्या दिवशी सोमवती अमावस्या संपली होती.
उद्घाटनावेळी बाहुल्या पुजण्यात आल्या अन्..
डिसेंबर महिन्यात एआय सेंटरच्या अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनावेळी बाहुल्या पुजण्यात आल्या होत्या.त्याबाबतही मी ट्वीट केलं होतं.त्यानंतर 28 जानेवारीला अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला.अजितदादांच्या फोटोला फूल्ल्या मारल्याचं स्वतः आमदार रोहित पवार यांनी प्रेसमध्ये सांगितलं होतं.माझा अंदाज आहे की,एस आय टी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडे माझी विनंती आहे की, अजित पवारांच्या विमान अपघाताची आणि कॅप्टन अशोक खरात भोंदू बाबाच्या ईशान्येश्वर मंदिरापर्यंत काही धागादोरा आहे का? याचा तपास झाला पाहिजे.
नक्की वाचा >> Mumbai News : 'मुंबई' करते मालामाल, देशातील एकमेव शहर; अहवालातून मोठी माहिती समोर
कारण त्याची शंका बनते त्याच अमावस्याला आणि काही दिवसात भिगवण रोडवरील सहयोग बंगल्यासमोरही अशीच पूजा करण्यात आली होती.दादा हे प्रचंड विज्ञानवादी होते.मात्र दादांच्या विमान अपघातामागे कोणते भक्त त्या ईशान्येश्वर मंदिरात गेले का?बारामती बाहेरच्या लोकांची इथे येऊन असं करण्याची हिम्मत होऊ शकत नाही.मात्र इथल्या काही लोकांना हाताशी धरून अघोरी पूजा केल्या का,अशा शक्यता नाकारता येत नाहीत.त्यामुळे याची चौकशी निपक्षपाती व्हावी.अजित पवारांच्या विमान अपघाताचा अँगल हा ईशान्येश्वर मंदिर भोंदू कॅप्टन अशोक खरात आणि त्यांचे भक्त यांचा काही संबंध आहे का,अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि एसआयटी भागाकडे करतो,असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world