जाहिरात

Kalyan News: कल्याणच्या 'या' कॉलेजमध्ये मधमाशांचे पोळे अन् बरंच काही..विद्यार्थ्यींनी केलं बोंब ठोक आंदोलन

कल्याण पूर्वेतील कमलादेवी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारच्या शैक्षणिक सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज तीव्र आंदोलन छेडण्यात आलं.

Kalyan News: कल्याणच्या 'या' कॉलेजमध्ये मधमाशांचे पोळे अन् बरंच काही..विद्यार्थ्यींनी केलं बोंब ठोक आंदोलन
ABVP Strike Against Kamladevi College Kalyan
मुंबई:

Kalyan Kamaladevi College News : कल्याण पूर्वेतील कमलादेवी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना योग्य प्रकारच्या शैक्षणिक सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. बोंब ठोक आंदोलन कॉलेजसमोर केले असता प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्याचा केला. कॉलेज प्रशासनाचा अनागोंदी कारभार भारतीय विद्यार्थी परिषद खपवून घेणार नाही, अशा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री शंतनू बिरोजे यांनी दिला आहे.

याप्रकरणी शंतनू बिरोजी यांनी म्हटलंय की, कमलादेवी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा दिल्या जात नाहीत.कॉलेजमध्ये अस्वच्छता आहे.परिसरात स्वच्छतागृह नाहीत.कॉलेजच्या इमारतीला मधमाशांचे पोळे लागले आहे.मैदानाची समस्या आहे. या समस्या दूर करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2025 मध्ये कॉलेज प्रशासनाला एक निवेदन देण्यात आले होते. तरीही परिस्थिती जैसे थे आहे.आयुष बरई या विद्यार्थ्याने कमलादेवी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.त्याला अन्य शैक्षणिक शाखेत प्रवेश वर्ग केला आहे.ही बाब त्या विद्यार्थ्याला विश्वासात न घेता करण्यात आल्याचा आरोप बिरोजे यांनी केला आहे. 

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील कोचिंग क्लासमध्ये भयंकर घटना, आठवीच्या विद्यार्थ्याचे प्रायव्हेट पार्टचे फोटो काढले अन्..

'त्या' विद्यार्थ्याचे प्रकरण विद्यापीठाकडे न्यायप्रविष्ट

दरम्यान कॉलेज प्रशासनाच्या वतीने सचिन चौधरी यांनी सांगितले की,कॉलेजकडून सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप आहे. तर या संदर्भात कॉलेजमधील एकाही विद्यार्थ्याने अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे केलेली नाही.त्याचबरोबर आयुष बरई या विद्यार्थ्याचे प्रकरण विद्यापीठाकडे न्यायप्रविष्ट आहे.मात्र संबंधित विद्यार्थ्याने कॉलेजमधून त्याची कागदपत्रे काढून घेतली आहेत. 

नक्की वाचा >> Mumbai News: धारावीतील शेकडो कामगारांनी गावची वाट धरली, मुंबईकरांना लॉकडाऊनची भीती? नेमकं काय घडलंय?

संबंधित आंदोलनकर्ते कॉलेजसमोर आंदोलन करीत होते. त्यांचे निवेदन आत्ता स्विकारले आहे.अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि कॉलेज प्रशासन यांच्यावतीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात काय तक्रार दाखल केली जाते? त्याआधारे पोलीस पुढील कार्यवाही करणार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com