Ambarnath News : अंबरनाथमध्ये नागरिकांचं पाण्यासाठी उपोषण; अधिकार्‍यांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन

Ambarnath Water Issue : माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.

जाहिरात
Read Time: 1 min

निनाद करमरकर, अंबरनाथ

Ambarnath News : अंबरनाथच्या शिवगंगा नगरमधील नागरिक मागील अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात गुरुवारी नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केलं. माजी नगरसेवक रवी पाटील आणि माजी नगरसेविकास ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आलं.

(नक्की वाचा-  Govt Employee : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; पेन्शनबाबत सरकारचा मोठा निर्णय)

शिवगंगा नगरमध्ये मागील काही दिवसांपासून पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.  याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला. 

अखेर शिवगंगा नगरमधील रहिवाशांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. गुरुवारी सकाळी माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेविका ज्योत्स्ना भोईर यांच्या नेतृत्वाखाली या उपोषणाला सुरुवात करण्यात आली. 

(नक्की वाचा- रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लागणार; नियमबाह्य भाडे आकारणाऱ्यांची WhatsApp वर करता येणार तक्रार)

यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत उपोषणकर्त्यांची भेट घेतली आणि पाण्याची ही समस्या 3 ते 4 दिवसात सोडवण्याचं आश्वासन दिलं. याबाबतचं लेखी पत्र रवी पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं.

Advertisement

Topics mentioned in this article