Ambedkar Jayanti 2026: पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 एप्रिल व 14 एप्रिल रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहली'चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे भेट देणारे पर्यटक तसेच अनुयायींसाठी ही सहल निःशुल्क आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, जीवनचरित्र, विचार पर्यटक तसेच नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या टूर सर्कीट सहलीचा मुख्य उद्देश आहे. "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींनी पावन झालेल्या मुंबई, नाशिक आणि नागपूरमधील स्थळांना भेट देणे, हा केवळ एक प्रवास नसून त्यांचा समृद्ध वारसा जवळून अनुभवायची सुवर्ण संधी आहे. या उपक्रमामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनालाही चालना मिळेल. पर्यटक, नागरिक, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे", असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
सहलीमध्ये मुंबईतील कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटींग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तसेच नागपूर येथील दीक्षाभूमी, चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस या स्थळांचा समावेश आहे. 13 एप्रिल व 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता टूर सर्कीट सहलीला सुरुवात होईल. मुंबईतील टूर सर्कीट सहलीची सुरुवात चैत्यभूमी, दादर येथून होणार आहे. तर नाशिकमधील गडकरी चौक आणि नागपूरमधील दीक्षाभूमी येथून टूर सर्कीट सहलीला सुरुवात होईल.
कोणत्या दिवशी उपक्रमाला होणार सुरुवात?
या सहली अंतर्गत दररोज विशेष बसेस सोडण्यात येतील. दरम्यान प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर बसमध्ये प्रवेश उपलब्ध करुन देण्यात येईल. सहलीमध्ये सहभागी होणारे पर्यटक/अनुयायी यांच्यासाठी निःशुल्क प्रवास, सहल मार्गदर्शक, अल्पोपहार आदी सोयी-सुविधा पर्यटन विभागाद्वारे पुरविण्यात येणार आहेत. पर्यटन विभागाने सदर सहलीचे योग्य नियोजन केले असून पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी ही सहल महत्त्वपूर्ण ठरेल. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे औपचारिक उद्घाटन 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
(नक्की वाचा: Jyotiba Phule Jayanti 2026: अर्धांगवायूचा झटका आला तरी डगमगले नाहीत; PM मोदींनी खास लेख लिहून ज्योतिबा फुलेंना वाहिली आदरांजली)
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, "चैत्यभूमी, मुक्तीभूमी, दीक्षाभूमी सारखी ठिकाणे फक्त धार्मिक स्थळे नसून या ठिकाणांना सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व आहे. टूर सर्कीट सहल या उपक्रमाद्वारे समतेचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. नव्या पिढीला सदर टूर सर्कीट सहलीमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान, त्यांचे विचार जवळून अनुभवता येतील. या उपक्रमामध्ये अधिकाधिक पर्यटक सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे."
पर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. हेच लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त टूर सर्कीट सहलीचा उपक्रम पर्यटन विभागाने हाती घेतला आहे. यासाठी पर्यटन विभागाने सखोल नियोजन केले आहे. या टूर सर्कीट सहलीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, त्यांचे कार्य आणि विचार समजून घेण्यास पर्यटकांना मदत होईल.
टुअर सर्कीटची वैशिष्ट्येआयोजनाची ठिकाणे – मुंबई , नाशिक आणि नागपूर
कालावधी – 13 एप्रिल 2026 आणि 14 एप्रिल 2026
सुविधा – प्रत्येक शहरात दोन बसेसद्वारे सहल, टुअर मार्गदर्शक, अल्पोपहार, पिण्याचे पाणी

Photo Credit: NDTV Marathi
सहलीच्या नोंदणीसाठी कोणाला संपर्क करावा?
मुंबईसाठी संपर्क – पवन पवार : 7666603211, सूरज चतुर्वैदी : 8108175530
नाशिकसाठी संपर्क – तुषार शिंदे : 9890255157, ऋषिकेश चव्हाण : 8806841468
नागपूरसाठी संपर्क – अविनाश गजघाटे : 9823111203
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world