जाहिरात

Amernath News: रिल्स पाहून मलंगगडावर गेले, डोंगरात रस्ता चुकले.. पुढे मामा- भाच्यांसोबत जे घडलं; थरारक घटना

अवघड डोंगररांग, घसरडा मार्ग आणि अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीतही बचाव पथकाने अथक प्रयत्न करत अखेर मध्यरात्री या तिघांची सुखरूप सुटका केली आहे.

Amernath News: रिल्स पाहून मलंगगडावर गेले, डोंगरात रस्ता चुकले.. पुढे मामा- भाच्यांसोबत जे घडलं; थरारक घटना

Ambernath News: अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तीन तरुणांच्या जीवाशी खेळ करणारी धोकादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील रिल्स पाहून ट्रेकिंगचा मोह आवरता न आल्याने हे तिघेही मामा-भांजे टेकडी परिसरात गेले होते. मात्र उंच टेकडीवर चढल्यानंतर उतरताना मार्गाचा अंदाज न आल्याने ते गडावरच अडकले होते. ही घटना पुन्हा एकदा सोशल मीडियावरील बेफाम ट्रेंड्स पर्यटकांच्या जीवावर बेतत असल्याचे स्पष्ट करणारी ठरली आहे. त्यानंतर तातडीने मदतकार्य हाती घेत त्या तिघांची सुखरूप सुटका मध्यरात्री करण्यात आली आहे.

Mumbai Local News: 15 डब्यांच्या लोकलमधून दिवा, डोंबिवली स्टेशनवर उतरता येणार नाही? मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण

रिल्सच्या नादात जिवाशी खेळ...!

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम सिंग (वय २४), मंगेश प्रजापती (वय २५) आणि गुरुप्रसाद विश्वकर्मा रा. मालाड पूर्व, मुंबई हे तिघे मित्र मलंगगडावर ट्रेकिंगसाठी आले होते. इन्स्टाग्रामवरील आकर्षक रिल्स पाहून त्यांनी मामा-भांजे टेकडी गाठली होती. मात्र परतीच्या वाटेवर अंधार वाढल्याने व मार्ग धोकादायक झाल्याने ते अडकले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस आणि अंबरनाथ अग्निशमन दल तात्काळ सतर्क झाले होते.

अग्निशमन दल प्रमुख भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखालील पथक, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गावकरी तरुणांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू ठेवण्यात आले होते. अवघड डोंगररांग, घसरडा मार्ग आणि अंधार अशा प्रतिकूल परिस्थितीतही बचाव पथकाने अथक प्रयत्न करत अखेर मध्यरात्री या तिघांची सुखरूप सुटका केली आहे.

Wardha Accident: 'काळजी घे, अभ्यास कर..' लेकीला कॉलेजसाठी पुण्यात सोडलं, घरी येताना अख्ख कुटुंब संपलं

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com