जाहिरात

Wardha Accident: 'काळजी घे, अभ्यास कर..' लेकीला कॉलेजसाठी पुण्यात सोडलं, घरी येताना अख्ख कुटुंब संपलं

 "काळजी घे... मन लावून अभ्यास कर..." असे शेवटचे शब्द कदाचित तिच्या कानात अजूनही घुमत असतील.

Wardha Accident: 'काळजी घे, अभ्यास कर..' लेकीला कॉलेजसाठी पुण्यात सोडलं, घरी येताना अख्ख कुटुंब संपलं

निलेश बंगाले, वर्धा:

Samruddhi Highway Accident:  समृद्धी महामार्गावर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला, या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मुलीला MBA च्या शिक्षणासाठी पुण्याला सोडून माघारी परतत असताना टिपले कुटुंबावर काळाने घाला घातला. अपघातात कारचालक राजेश टिपले, जान्हवी टिपले आणि सुषमा टिपले या चौघांचाही अंत झाला.

समृद्धीवर मृत्यूचे तांडव, सहा जणांचा दुर्दैवी अंत!!

समोर आलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर इथेनॉलचा एक ट्रक पलटी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहने टप्प्याटप्प्याने दुसऱ्या लेनवरून सोडली जात होती. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या मिरचीने भरलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रकखाली अक्षरशः चिरडली गेली. धडकेनंतर ट्रकला अचानक आग लागली आणि काही क्षणांत सर्व काही जळून खाक झाले.

Siya Goyal: केतन का आवडतो? सिया 2 शब्दात असं काही बोलली; साखरपुड्यातील नवा VIDEO समोर

ही धडक इतकी भीषण होती की कार ट्रकखाली गेल्याने पूर्ण चुराडा झाला, ज्यामुळे आग लागली आणि या आगीमध्ये ट्रकमधील चालक आणि क्लिनर तसेच कारमधील चौघे ज्यामध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे अशा सहाही जणांचा होरपळून मृत्यू झाला. या कारमधील चौघापैकी हे चौघही जण हे सालोड जिल्ह्यातील सालोड येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लेकीला पुण्याला सोडायला गेले अन् मृत्यूने गाठलं 

   या अपघातातील राजेश टिपले यांना दोन जुळ्या मुली, दोघींवरही पालकांचे अपार प्रेम.  त्यापैकी एका मुलीला पुण्यात एमबीएला (MBA) प्रवेश मिळाला. मुलीच्या आयुष्यातील हा मोठा टप्पा साजरा करण्यासाठी आणि तिला महाविद्यालयात सोडण्यासाठी संपूर्ण कुटुंब पुण्याला गेले होते. प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली. मुलीला धीर देत आई-वडिलांनी निरोप घेतला.  "काळजी घे... मन लावून अभ्यास कर..." असे शेवटचे शब्द कदाचित तिच्या कानात अजूनही घुमत असतील. पण हा निरोप आयुष्यातील शेवटचा निरोप ठरेल, याची कल्पनाही कोणाला नव्हती. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Central Railway: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! मध्य रेल्वेवर 7 वर्षानंतर मोठा बदल; प्रवास होणार सुखकर

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com