अमरावतीच्या शेतकऱ्यांचे अनुदान गेलं काश्मीरात, नक्की काय घडलं?

पीएम किसान योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. मात्र अमरावती जिल्ह्यातील शहापूर गावातील 82 शेतकऱ्यांचे हे अनुदान चक्क जम्मू काश्मीरच्या शहापूर गावात गेले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
अमरावती:

शेतकऱ्यांना मदत म्हणून केंद्र सरकार व राज्यसरकारकडून पीएम किसान  योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. मात्र अमरावती जिल्ह्यातील शहापूर गावातील  82 शेतकऱ्यांचे हे अनुदान चक्क जम्मू काश्मीरच्या शहापूर गावात  गेले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान किसान योजने अंतर्गत वर्षाला 12 हजार अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र गेल्या दोन वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या शहापूर यागावातल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. या शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर झाले पण ते त्यांच्या खात्यात जमाच झाले नाही. याची चौकशी केल्या नंतर एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावतीच्या शहापूरच्या शेतकऱ्यांचे अनुदान थेट हजारो किलोमिटर दुर असलेल्या कश्मीरच्या शहापूर यागावात गेले आहे.  

हेही वाचा - माजी मंत्र्याच्या पत्नीच्या ट्वीटने पुणे अपघातात ट्विस्ट, आणखी एक बाजू आली समोर

अमरावती जिल्ह्यातील एक दोन नव्हे तर तब्बल 83 शेतकऱ्यांचे हे अनुदान कश्मीरमध्ये गेले आहे. या शेतकऱ्यांचे पैसे ज्या कोडवर जमा होत आहेत तो कोड जम्मू कश्मीरचा आहे. त्यावर जेके असा उल्लेख आहे. याबाबत गेल्या दोन वर्षापासून शेतकरी याबाबतची तक्रार करत आहेत. मात्र त्याचा काही एक परिणाम होत नव्हता. हे पैसे नक्की कुठे जात आहेत याचाही ठाव ठिकाणा लागत नव्हता. 

हेही वाचा - 14 वर्षाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला

याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांच्याकडे केली. चौकशी केल्यानंतर हे पैसे जम्मू कश्मीरमध्ये जात असल्याचे समोर आल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला चालले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुदान काश्मीला जात आहे. असं होऊ नये याची खबरदारी घेतली पाहीजे अशी प्रतिक्रीया बच्चू कडू यांनी दिली आहे. या विषयी लक्षवेधी विधानसभेत मांडणार असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले. 

Advertisement