जाहिरात

14 वर्षाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला

एकीकडे पुणे पोर्श कारच्या अपघातात अल्पवयीन तरूणाला कोर्टाने तातडीने जामीन मंजुर केला. 300 शब्दांचा निबंध आणि अन्य अटींवर हा जामीन मंजूर केला. ही बाब सर्वांसमोर असताना उत्तराखंडमधल्या एका प्रकरणात कोर्टाने अल्पवयीन तरूणा विरोधात कठोर निर्णय घेतला आहे.

14 वर्षाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला
नवी दिल्ली:

एकीकडे पुणे पोर्श कारच्या अपघातात अल्पवयीन तरूणाला कोर्टाने तातडीने जामीन मंजुर केला. 300 शब्दांचा निबंध आणि अन्य अटींवर हा जामीन मंजूर केला. ही बाब सर्वांसमोर असताना उत्तराखंडमधल्या एका प्रकरणात कोर्टाने अल्पवयीन तरूणा विरोधात कठोर निर्णय घेतला आहे. या अल्पवयीन तरूणाने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षाच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर तो व्हायरलही केला होता. याघटनेनंतर आपली बदनामी होईल या भितीने त्यामुलीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी सेशन कोर्ट, हाय कोर्ट त्यानंतरही सुप्रिम कोर्टानेही त्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुणे केसेमध्ये दिलेल्या जामीनाची चर्चा आता देशभर होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला 

उत्तराखंडच्या एका शाळेत एका अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडीओ व्हायर केला गेला होता. या प्रकरणी हरिद्वारच्या कोर्टाने आरोपी अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला होता. त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर त्यामुलाच्या आईने उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती. मात्र खालच्या कोर्टाने जामीन नाकारण्याचा निर्णय उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. शिवाय हा मुलगा बेशिस्त असल्याची टिप्पणी केली होती. त्यामुळे मुलाची आई सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी गेली होती. 

हेही वाचा - देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?

सर्वोच्च न्यायालयाचाही निर्णय कायम 

या प्रकरणी वरीष्ठ वकील लोकपाल सिंह यांनी मुलगा हा अल्पवयीन आहे. त्यामुळे त्याचा ताबा त्याच्या आई वडीलांना देण्यात यावा. त्याला बालसुधार गृहात ठेवले जाऊ नये अशी सर्वोच्च न्यायालयात मागणी केली. मात्र न्यायमुर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमुर्ती पंकज मिथल यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास केला. शिवाय तोच निर्णय कायम ठेवत जामीन देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. जे पुरावे आमच्या समोर आले आहेत ते पाहात उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या आम्ही हस्तक्षेप करणार नाही असे स्पष्ट केले. 

हेही वाचा - माजी मंत्र्याच्या पत्नीच्या ट्वीटने पुणे अपघातात ट्विस्ट, आणखी एक बाजू आली समोर

अश्लील व्हिडीओचे प्रकरण काय? 

ज्या 14 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली त्यांनी संबधीत अल्पवयीन मुला विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात त्यांनी मुलीचा अश्लील व्हिडीओ बनवला गेला. त्यानंतर शाळेतल्या मुलांमध्ये तो व्हायरल केला गेला. त्यानंतर बदनामीच्या भितीने मुलीने आत्महत्या केल्याच आरोप मुलीच्या वडीलांनी तक्रारीत केला आहे. हा व्हिडीओ शाळेत व्हायरल झाल्यानंतर ती मुलगी 22 ऑक्टोबरपासून गायब झाली होती. त्यानंतर तीचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. 

हेही वाचा - आता कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन पबला टाळे

कोर्टाने जामीन का नाकारला? 

जामीन नाकारताना उच्च न्यायालयाने हा मुलगा चुकीचा संगतीला लागला आहे. शिवाय तो बेशीस्त आहे. त्याला कडक शिस्तीची गरज आहे. शिवाय जर त्याला सोडले तर त्याच्या बरोबर आणखी चुकीच्या घटना होतील. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य नाही असे कोर्टाने सांगितले. सामाजीक, मेडीकल आणि शाळेने या प्रकरणात अहवाल कोर्टासमोर सादर केले होते. ते अहवाल पाहाता त्या अल्पवयीन मुलाला जामीन न देणेच योग्य असल्याचे कोर्टाने सांगितले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
साडे सहा कोटीची व्हेल माशाची उलटी विकायला आले अन् ग्राहक म्हणून पोलिस भेटले, पुढे...
14 वर्षाच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला
Badlapur crime 52-year-old father sexually abused his 15-year-old daughter
Next Article
बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!