जाहिरात
This Article is From May 22, 2024

माजी मंत्र्याच्या पत्नीच्या ट्वीटने पुणे अपघातात ट्विस्ट, आणखी एक बाजू आली समोर

राजकीय लागेबांधे, पैशाचा खेळ, बिल्डरचा मुलगा या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. त्यात आता माजी मंत्र्याच्या पत्नीने एक ट्वीट करत या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण केला आहे.

माजी मंत्र्याच्या पत्नीच्या ट्वीटने पुणे अपघातात ट्विस्ट, आणखी एक बाजू आली समोर
पुणे:

पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर नवनव्या गोष्टी आणि खुलासे समोर येत आहेत. या अपघातात एका अल्पवयीन तरूणाने दोन निष्पाप तरूण आणि तरूणीला चिरडले. त्यानंतर त्याला लगेचच जामीनही मिळाला. जामीन देताना जी शिक्षा सुनावली गेली त्यामुळे तर पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय लागेबांधे, पैशाचा खेळ, बिल्डरचा मुलगा या सर्व गोष्टींवर चर्चा झाली. त्यात आता माजी मंत्र्याच्या पत्नीने एक ट्वीट करत या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांच्या पत्नी सोनाली तनपूर यांनी हे ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात. कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंटनंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या...संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा.

हेही वाचा - आता कारवाईचा बडगा, पुण्यातील दोन पबला टाळे

सोनाली तनपूरे यांनी हा ट्वीट केले आहे. त्यामुळे अपघात करणाऱ्या त्यामुलाची शाळेतही वर्तवणूक योग्य नव्हती हे समोर आले आहे. शिवाय त्याची तक्रार केल्यानंतरही त्याचे पालक त्याला पाठीशी घालत होते. त्याच्यावर त्यावेळीच योग्य कारवाई केली गेली असती तर ही वेळ आली नसते असेच सोनाली यांच्या ट्वीटमुळे स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडीत प्राजक्त तनपूरे यांनी मंत्री म्हणून काम केले आहे. एका मंत्र्याच्या मुलाबरोबर असे होऊ शकते तर इतर मुलांबाबत त्या तरूणाच्या मनात काय भावना असेल याचा अंदाज येतो. 

हेही वाचा - कोर्टाच्या निर्णयाचा पोलिसांनाही धक्का, अल्पवयीन मुलाच्या जामीनावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पुण्यात पोर्शे कारच्या अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या अपघातात दोन निष्पाप तरूण आणि तरूणीला जीव गमवावा लागला होता. अपघाता पुर्वी पोर्शे कार चालवणाऱ्या अल्वपयीन तरूणाने पबमध्ये जाऊन दारूचे सेवन केल्याची चर्चा आहे. अल्पवयीन असतानाही त्यांना दारू दिली गेली हीबाब समोर आली आहे. या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यातल्या दोन पबला थेट टाळे ठोकण्यात आले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com