शुभम बायस्कार ,प्रतिनिधी
Amravati ZP News Today : अमरावती जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील एकूण 43 गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनांची कामे मंजूर करण्यात आली आहे. यापैकी 22 कामे विहित मुदतीत पूर्ण न केल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदारांवर प्रतिदिन 100 रुपये दंड आकारत त्यांना सशर्त मुदतवाढ देण्याचे कठोर आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी काढले. हे काम वेळेत पूर्ण न झाल्याची धक्कादायक बातमी एनडीटीवी मराठीने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर लगेच 10 मार्च रोजी महापात्र यांनी आदेश जारी केले आहेत.
कोणती 22 कामे रखडली? कोण आहेत कंत्राटदार?
दंड व मुदतवाढ लागू झालेल्या 22 कामांमध्ये दोन प्रमुख कंत्राटदारांचा समावेश आहे.नागपूर येथील पी.एस.कन्सट्रक्शन कंत्राटदाराकडे एकूण 9 कामे होती. सर्व कामांचा कालावधी 12 महिने होता व 0.06 टक्के कमी दराने कंत्राट दिले होते.एकूण 43 कामांपैकी उर्वरित 21 कामे इतर कंत्राटदारांकडे होती. त्यात मौजे तळेगाव दशासर (ता. धामणगाव रेल्वे) 73 लाख 42 हजार 261, मौजे अंबाडा व मौजे हिवरखेडा (ता. मोर्शी) अनुक्रमे 60 लाख 8 हजार व 66 लाख 11 हजार 905, मौजे कुऱ्हा (ता. तिवसा) 71 लाख 34 हजार 036, मौजे नेरपिंगळाई (ता.मोर्शी),1 कोटी 5 लाख 47 हजार 361, मौजे खोलापूर (ता.भातकुली), 74 लाख 93 हजार 874- मौजे वलगाव, मौजे नांदगाव पेठ व मौजे शिराळा (ता. अमरावती) अनुक्रमे 1 कोटी 84 लाख 7 हजार 160,तसच 85 लाख 10 हजार 876 व 64 लाख 97 हजार 83 या कामांचा समावेश आहे.
नक्की वाचा >> Ratnagiri News: रत्नागिरी हादरलं! पर्यटकांमध्ये घबराट, शहर आणि आसपासच्या परिसरातील लोक घराबाहेर पळाले
चंद्रकांत शिवराम पाटील यांच्याकडे चांदूरबाजार व दर्यापूर तालुक्यांतील 5 कामे (6 महिने मुदत), ओबी सानप कन्सट्रक्शन यांच्याकडे वरूड, अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यांतील 9 कामे; ताराशंकर इन्फ्रॅकॉन प्रा.लि(Tarashanakar Infracon Pvt.Ltd) यांच्याकडे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार तालुक्यांतील 4 कामे; तसेच फुरकान अहमद रफीक अहमद यांच्याकडे दर्यापूर तालुक्यातील पीडब्ल्युएम यूनिट उभारणीचे 1 काम होते. या 21 कामांच्या स्थितीबाबत जिल्हा परिषदेकडून आढावा घेण्यात येतं असल्याचं सांगितलं जातं आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद, महिला बचत गटही चिंतेत, घडलंय तरी काय?
कामे रखडण्याची कारणे काय?
कंत्राटदारांनी कामे रखडण्यामागे पावसाळी हंगाम, कुशल मजूर व बांधकाम साहित्याची अनुपलब्धता, जमीन संपादनातील अडचणी आणि ग्रामपंचायतींकडून जमीन कागदपत्रे उशिरा मिळणे ही कारणे नमूद केली.सीईओ संजीता महापात्र यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, मुदतवाढ मिळूनही कामे विहित वेळेत पूर्ण न झाल्यास प्रतिदिन १०० रुपयांप्रमाणे दंड कंत्राटदाराच्या देयकातून कपात केला जाईल. तसेच निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाईल, असा दुहेरी इशारा देण्यात आला आहे.