जाहिरात

Ratnagiri News: रत्नागिरी हादरलं! पर्यटकांमध्ये घबराट, शहर आणि आसपासच्या परिसरातील लोक घराबाहेर पळाले

रत्नागिरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसराला आज रात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले.

Ratnagiri News: रत्नागिरी हादरलं! पर्यटकांमध्ये घबराट, शहर आणि आसपासच्या परिसरातील लोक घराबाहेर पळाले
Ratnagiri Earthquake News

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

Ratnagiri Earthquake News Today : रत्नागिरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसराला आज रात्री भूकंपाचे सौम्य धक्के बसले. रात्री 8 वाजून 19 मिनिटांनी अचानक जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. त्यानंतर अनेक जण भीतीपोटी घराबाहेर पडले. सुदैवाने कुठेही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाहीय. 2.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने रत्नागिरी हादरून गेलं आहे.  

हरचेरी परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू

भूकंपमापन यंत्रावर या धक्क्यांची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी हा या भूकंपाचा केंद्रबिंदू (Epicenter)असल्याचे समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी, केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर खोलीवर असल्याने रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातही हे धक्के स्पष्टपणे जाणवले.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद, महिला बचत गटही चिंतेत, घडलंय तरी काय?

प्रशासनाचे आवाहन: 'घाबरू नका, सतर्क राहा'

भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप हा 'सौम्य' श्रेणीत येतो, त्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता कमी असते.  प्रशासनाकडून नागरिकांना खालील आवाहन करण्यात आले आहे. 

घाबरू नका:  2.8 रिश्टर स्केलचा भूकंप हा 'सौम्य' श्रेणीत येतो, ज्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता अत्यंत कमी असते.

सतर्क राहा: जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात गॅस सिलिंडरचा साठा किती? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी दिली सर्वात मोठी अपडेट


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com