पुणे महानगरपालिका क्षेत्रातील एकाच इमारतीतील एकूण मतदान केंद्रांमध्ये 10 हजारापेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी विविध सुविधेबाबत समन्वय साधण्याकरीता मतदान केंद्रनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुरंदर, वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोमेंट आणि कसबापेठ या विधानसभा मतदारसंघा अंतर्गत पुणे महानगर पालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्याठिकाणी विविध सुविधांबाबतचे दिशादर्शक फलक, पिण्याचे पाणी, स्वच्छता, गर्दीचे नियोजन आदी बाबींमध्ये समन्वय साधण्याकरीता पुणे महानगरपालिकेच्या समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती डॉ. दिवसे यांनी दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - निवडणूक महाराष्ट्राची पण तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा का?
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झालं आहे. प्रचाराला आता काही तासचं शिल्लक राहीले आहेत. अशा वेळी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पुर्ण केली आहे. मतदारांना काही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकसभेला शहरी भागात मतदान कमी झाले होते. त्या तुलनेत ग्रामिण भागात जास्त मतदान झाले होते. पण आता मतदानाचा टक्का वाढवण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे.