अभिनेता सलमान खानच्या हत्येचा आणखी एक कट उघड, धागेदोरे पाकिस्तानात

पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा त्याने कट रचला होता. त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे मिळवण्याची योजना होती.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

अभिनेता सलमान खान याच्या हत्येचा आणखी एक कट उधळल्याचे समोर आले आहे. हा कट लॉरेन्स बिश्नोई टोळीने आखला होता. पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा त्याने कट रचला होता. त्यासाठी पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून शस्त्रे मिळवण्याची योजना होती. अशी माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवून चार जणांना अटक केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने कॅनडास्थित चुलत भाऊ अनमोल बिश्नोई आणि त्याचा सहकारी गोल्डी ब्रार याच्यासोबत हा कट रचला. त्यातून त्याने पाकिस्तानातील एका शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून एके-47, एम-16 आणि इतर अत्याधुनिक शस्त्रे विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचण्यासाठी हा सर्व खटाटोप केला जात होता. पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार सलमान खानच्या गाडी थांबवणे आणि त्याच्या फार्म हाऊसवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला गेला होता. 

हेही वाचा - लोकसभेच्या 7 व्या टप्प्यासाठी मतदान, मोदी - कंगनासह अनेक मोठे चेहरे मैदानात

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन जणांना या पूर्वीच अटक करण्यात आली होती. महिनाभरापूर्वी लॉरेन्स विश्नोई टोळीने हा हल्ला केला होता. पोलिस तपासात ही बाब समोर आली होती. दरम्यान पुन्हा एकदा सलमान खान वर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्लॅन आखला गेला होता. नवी मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याच्या योजनेचा तपास सुरू आहे.

Advertisement