संजय राठोड यांचा आणखी एक लाडका अधिकारी; नियुक्ती नसताना करतोय जलसंधारण विभागाचं काम

गेले अनेक महिने यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात वारंवार प्रयत्न करून देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडून विशाल राठोड यांची खाजगी सचिव पदावर नियुक्त करण्याबाबत अद्यापही अधिकृत शासकीय आदेश काढले नसल्याची माहिती एनडीटीव्हीला देण्यात आलेली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नवीन लाडका अधिकारी परत एकदा चर्चेत आला आहे. जलसंधारण विभागामध्ये सुनील कुशिरे या एकाच अधिकाऱ्यावर तीन अतिरिक्त पदांचा कार्यभार देत मेहरबान झालेले संजय राठोड यांच्या कार्यालयात ज्या अधिकाऱ्याची नियुक्तीच नाही असा विशाल राठोड अधिकारी स्वतः खाजगी सचिव असल्याचा दावा करत आहे.

जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या शासकीय पत्रावर खाजगी सचिव म्हणून विशाल राठोड स्वाक्षरी करत सर्व प्रशासन यंत्रणा चालवत आहे. मात्र विशाल राठोड यांची खाजगी सचिव म्हणून अद्यापही जलसंधारण खात्यामध्ये नियुक्ती झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. विशाल राठोड यांना खाजगी सचिव नियुक्त करावं म्हणून जलसंधारण मंत्री संजय राठोड हे खूप आग्रही आहेत. 

Advertisement

Vishal Rathod

वास्तविक राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपानंतर शिवसेनेतील संजय राठोड यांच्या कार्यालयात इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती अधिकृत करण्यात आली आहे. मात्र अद्यापही खाजगी सचिव पदावर नियुक्ती झालेली नाही. राठोड हे स्वतः जलसंधारण खात्याचे मंत्री असून विशाल राठोड यांना खाजगी सचिव म्हणून नियुक्त कराव, यासाठी जास्त आग्रही आहेत. 

गेले अनेक महिने यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात वारंवार प्रयत्न करून देखील मुख्यमंत्री कार्यालयाकडून विशाल राठोड यांची खाजगी सचिव पदावर नियुक्त करण्याबाबत अद्यापही अधिकृत शासकीय आदेश काढले नसल्याची माहिती एनडीटीव्हीला देण्यात आलेली आहे. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कार्यपद्धतीविषयी आधीच वाद निर्माण असताना विशाल राठोड यांच्यासाठी इतके आग्रही का? असा सवालही आता विचारला जात आहे. 

विशाल राठोड या आधीही काही प्रकरणांमध्ये वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेला आहेत विशेष म्हणजे वेगवेगळ्या शासकीय बैठकांमध्ये सुद्धा विशाल राठोड यांचा थेट सहभाग तसेच हस्तक्षेप यावरूनही राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय वर्तुळात वेगळी चर्चा आहे.

विशाल राठोड स्वतः खाजगी सचिव म्हणून अद्यापही नियुक्त नाही. पण जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून निघणाऱ्या अधिकृत दौऱ्यावर तसेच प्रशासकीय पत्रांवर विशाल राठोड स्वतः खाजगी सचिव म्हणून उल्लेख करत स्वाक्षरी करत पत्र देत आहे. वास्तविक मंत्री कार्यालयामधील पत्रावर खोट्या पदांचा वापर करणे अतिशय गंभीर गुन्हा आहे. विशाल राठोड यांच्या कार्यपद्धतीवरून अद्यापही मुख्यमंत्री कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाला नसल्यानेच खाजगी सचिव नियुक्ती झालेली नाही. संजय राठोड देखील विशाल राठोडला पाठीशी टाकत असल्यामुळेच हे होत आहे का? अशी जोरदार चर्चा आहे. आता मुख्यमंत्री कार्यालय विशाल राठोड यांच्यावर कारवाई करणार का याकडे लक्ष आहे

Advertisement

Topics mentioned in this article