Tukaram Mundhe : कलाकार - ब्रँडही आता मुंढे यांच्या रडारवर; ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी FDA उचलणार मोठं पाऊल

आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच पहिल्या दिवसापासून अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, प्रतिनिधी

Mumbai News : आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच पहिल्या दिवसापासून अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या दोनच दिवसांत मुंढे यांनी अवैध गुटखा आणि भेसळखोरांविरुद्ध मोहिमेचा धडाका लावला असून, आता त्यांचा मोर्चा ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या भ्रामक जाहिरातींकडे वळला आहे.

फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर एफडीएची करडी नजर...

ब्रँडच्या नावाखाली मोठमोठी आश्वासने देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर आता एफडीएची करडी नजर राहणार आहे. विशेष म्हणजे, केवळ उत्पादकच नव्हे, तर चुकीची माहिती देणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी होणारे जाहिरातदार आणि त्या उत्पादनाचा प्रचार करणारे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणजेच कलाकार यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. आरोग्याशी  खेळणाऱ्या कोणत्याही भ्रामक दाव्यांची आता खैर केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

नक्की वाचा - 21 वर्षात तुकाराम मुंढेंच्या बदलीची Silver Jubilee; दीड महिन्यात पुन्हा बदली, 3 अधिकाऱ्यांसाठीही मोठे आदेश

तुकाराम मुंढे यांचा सज्जड दम

उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांपासून ते जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक दुव्याची जबाबदारी आता निश्चित केली जाणार आहे. "ग्राहक संरक्षण ही आमची प्राथमिकता असून, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत," असा सज्जड दम मुंढे यांनी दिला आहे. तुकाराम मुंढे यांच्या या 'अॅक्शन मोड'मुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.