Ashadhi Vari : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी आज पुण्यात मुक्कामी

माऊलींच्या आजोळ घरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाच वाजून 45 मिनिटांनी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. 

Advertisement
Read Time: 1 min
पुणे:

संत तुकारामांची पालखी 28 जून रोजी देहूहून पंढरपुराकडे मार्गस्थ झाली आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. माऊलींच्या आजोळ घरातून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाच वाजून 45 मिनिटांनी पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम पुण्यात असणार आहे.  पुण्यामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही सोहळ्यातील वारकरी येणार एकत्र येणार आहेत. 

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पिंपरी चिंचवड करांचा निरोप घेत पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवलाय. काल सायंकाळी पिंपरी चिंचवड शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आगमन झालं काल रात्री पालखी आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुक्कामी होती, त्यानंतर आज पहाटे साडेचारच्या सुमारास महाआरती झाल्यानंतर या पालखीने पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवलं आहे.

नक्की वाचा - Rain Update : मुंबईत उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा; ठाण्यासह या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट

कालपासूनच वारकरी बांधवांची आणि पालखीचे मनोभावे सेवा पिंपरी चिंचवड करांनी केली होती, त्यानंतर आज ही संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल होणार आहे. आज दोन्ही पालख्यांचे मुक्काम  पुणे जिल्ह्यामध्ये असल्यामुळे पालखी मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असावा असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.