Vitthal Rakhumai Warkari Yojana 2026: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने 'विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2026' ची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत वारीच्या कालावधीत दुर्घटना किंवा अपघात झाल्यास वारकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.
7 जुलै ते 25 जुलै दरम्यान योजना लागू
चालू वर्ष २०२६ मध्ये पंढरपूर येथे 7 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत आषाढी वारी सोहळा पार पडत आहे. या कालावधीत वारीसाठी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांना या योजनेचा लाभ आणि संरक्षण मिळणार आहे.
योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत खालीलप्रमाणे:
1. अपघाती मृत्यू झाल्यास: वारीदरम्यान एखाद्या वारकऱ्याचा अपघाताने अथवा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास, त्यांच्या निकटच्या वारसदारास 4 लाख रुपये मदत दिली जाईल.
2. 60 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास: दुर्घटनेत 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास संबंधित वारकऱ्याला 2.50 लाख रुपये मदत मिळेल.
3. 60 टक्क्यांपर्यंत अपंगत्व आल्यास: वारीदरम्यान अपघात होऊन 60 टक्के अपंगत्व आल्यास 74 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल.
(नक्की वाचा: Ashadhi Wari: वारीच्या वाटेवर टाळ अन् घुंगरूचा संगम! गेल्या 32 वर्षापासून लावणी अन् वारकऱ्याची अनोखी परंपरा)
एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यास खर्चासाठी 16 हजार रुपयांची मदत केली जाईल.
एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्यास खर्चासाठी 5 हजार 400 रुपये मदत केली जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world