- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात पुण्यातील दिवे घाटातून वारकरी पुढे सरकत आहेत
- दिवे घाटात अजित पवारांसारखा दिसणाऱ्या तरुणाने हुबेहुब त्यांचा पेहराव करून लोकांना आश्चर्यचकित केले
- सागर बारस्कर नावाच्या पुण्यातील रहिवाशाने अजित पवारांसारखा गुलाबी जॅकेट आणि गॉगल घालून वारीत सहभाग घेतला
यशपाल सोनकांबळे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळ मजल दर मजल पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकत आहे. पुण्यातून हा सोहळा आता दिवे घाटातून पुढे जात आहे. दिवे घाटातून माऊलींची पालखी जातानाचा सोहळा याची देही याची डोळा पाहणे ही पर्वणीच असते. मात्र यावेळी दिवे घाटातून माऊलींची पालखी जात असताना सर्वांनाच एक सुखद धक्का बसला. तो म्हणजे या पालखी सोहळ्यात चक्क अजित पवार सहभागी झाले होते. त्यामुळे क्षणभर वारीत सहभागी झालेल्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्याला कारण ही तसेच होते. या वारीत अजित पवारांसारखा हुबेहुब दिसणार व्यक्ती सहभागी झाला होता. त्यांनी अजित पवारांसारखाच पेहराव केला होता.
त्यामुळे जो ज्यावेळी वारीत सहभागी झाला त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना घेराव घातला. त्यांच्यासोबत सेल्फी काढल्या. ऐवढचं काय तर एकच वादा अजितदादा अशा घोषणा ही दिल्या. त्यामुळे थोडा वेळासाठी तिथलं वातावरण बदललं होतं. सागर बारस्कर असं या तरुणाचं नाव आहे. त्यानेच अजित पवारांचा हुबेहुब पेहराव केला होता. तो पुण्यातील रविवार पेठेतील रहिवासी आहे. आपल्या मनाला वाटलं म्हणून आपण अजित पवारांचा पेहराव केला असं सागरनं यावेळी सांगितलं. दादांची कमतरता आज वाटत आहे. ज्यावेळी आळंदीत पाणी आलं त्यावेळी सर्वात आधी आठवण कुणाची आली असेल तर ती अजित पवारांची होती असं ही त्याने यावेळी आवर्जून सांगितलं.
सागरने सेम टू सेम अजित पवारां प्रमाणे पेहराव केला होता. गुलाबी रंगाचे जॅकेट, डोळ्याला ते घालायचे तसाच गॉगल आणि जशीच्या जशी हालचाल. त्यामुळे सर्वांना क्षणभर अजित पवारच आले की काय असा भास झाला. तिथे उपस्थित असलेल्यांनी ही त्याची कबुली दिली. काही जण म्हणाले की आम्हाला वाटलं अजित दादाच आले. दादा आमच्या सोबत वारीत आहेत असं वाटतय असं ही काहींनी सांगितलं. एक जण म्हणाला की मी दादांचा मोठा फॅन आहे. त्यांना आय लव्ह यू बोलायचं होतं. पण बोलता आलं नाही अशी खंत त्याने या निमित्ताने बोलून दाखवली. दादांनी केलेली कामं, वारकऱ्यांसाठी त्यांची असलेली आत्मियता याची आज आठवण येते असं ही काही जण बोलत होते.
दरम्यान स्ट्रीट सेन्स या स्वयंस्फुर्तीने स्थापन केलेल्या ग्रुपकडून बाईक एम्ब्युलन्सच्या माध्यमातून आयटी इंजिनियर्स सह अन्य क्षेत्रातील बाईक रायडर्स दिवेघाटात वारकऱ्यांची सेवा करत आहेत. 2014 पासून निरंतर हा उपक्रम सुरू आहे. घाट चढल्यानंतर अस्वस्थ वाटणाऱ्या वारकऱ्यांना बाईकवर मेडिकल सेंटरवर सोडण्याचं काम 16 जण निस्वार्थ भावनेने करत आहेत. सेवेनंतर आत्मिक समाधान वाटते, वारकऱ्यांमध्ये विठ्ठल दिसतो अशा भावना या बाइकर्सने व्यक्त केल्या आहेत.