जाहिरात

Pune News: काळ आला होता पण वेळ नाही! काही सेकंदातच रेल्वे कर्मचाऱ्याने वारकऱ्याला वाचवलं, धावत्या ट्रेनचा थरार

पंढरपूरकडे निघालेल्या एका वयोवृद्ध वारकऱ्याचा धावत्या रेल्वेखाली जाण्याचा थरारक प्रसंग पुण्यात घडला. मात्र, प्रसंगावधान राखत एका रेल्वे कर्मचाऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे या वारकऱ्याचे प्राण वाचले.

Pune News: काळ आला होता पण वेळ नाही! काही सेकंदातच रेल्वे कर्मचाऱ्याने वारकऱ्याला वाचवलं, धावत्या ट्रेनचा थरार
Pune Passenger Train Viral Video
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Train Viral Video : पंढरपूरकडे निघालेल्या एका वयोवृद्ध वारकऱ्याचा धावत्या रेल्वेखाली जाण्याचा थरारक प्रसंग पुण्यात घडला. मात्र, प्रसंगावधान राखत एका रेल्वे कर्मचाऱ्याने दाखवलेल्या धाडसामुळे या वारकऱ्याचे प्राण वाचले.या संपूर्ण घटनेचे दृश्य स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुण्यात थरकाप उडवणारी घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित वयोवृद्ध वारकरी पुण्यावरून पंढरपूरच्या दिशेने रेल्वेने प्रवासासाठी निघाले होते.याचदरम्यान ट्रेन सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि पाय घसरल्याने ते थेट रेल्वे रुळावर कोसळले.काही क्षणांसाठी परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

नक्की वाचा >> Nashik News: भावली धरण विनयभंग-मारहाण प्रकरणातील आरोपींना मकोका लागणार? 9 आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

रेल्वे कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखलं अन्..

वारकरी रुळावर पडल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या एका रेल्वे कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रेल्वे रुळावर उतरून वयोवृद्ध वारकऱ्याला सुरक्षित बाहेर काढले.त्यांच्या या तत्पर आणि धाडसी कृतीमुळे मोठी दुर्घटना टळली आणि वारकऱ्याचे प्राण वाचले.

नक्की वाचा >>Dombivli News: 15 दिवसांपूर्वी होणाऱ्या पतीचा अपघात झाला, डोंबिवलीच्या तरुणीला जबर धक्का, घरातच स्वत:ला संपवलं

घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

हा संपूर्ण थरारक प्रकार स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.रेल्वे कर्मचाऱ्याने दाखवलेले धैर्य आणि प्रसंगावधान यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसून येते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून रेल्वे कर्मचाऱ्याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com