जाहिरात

अशोक खरात शाहरुख खानपेक्षाही श्रीमंत? किंग खानची 40 वर्षांची मेहनत अन् खरातचं 15 वर्षांचं घबाड

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने 40 वर्षांच्या कारकिर्दीत 12,490 कोटींची संपत्ती कमावली असतानाच, भोंदूगिरी आणि अघोरी कृत्यांच्या माध्यमातून अवघ्या 15 वर्षांत 15,000 कोटींची माया जमवल्याचा आरोप अशोक खरातवर होत आहे.

अशोक खरात शाहरुख खानपेक्षाही श्रीमंत? किंग खानची 40 वर्षांची मेहनत अन् खरातचं 15 वर्षांचं घबाड

राहुल वाघ, नाशिक

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान... ज्याने 'फौजी' मालिकेपासून सुरुवात करून आज जगभरात आपले नाव कमावले आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार शाहरुखची संपत्ती 12,490 कोटी रुपये आहे. मात्र, महाराष्ट्रात एका अशा व्यक्तीचे नाव समोर आले आहे, ज्याची संपत्ती शाहरुखपेक्षाही जास्त असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तो व्यक्ती दुसरा तिसरा नसून भोंदूबाबा अशोक खरात आहे.

शाहरुख खानची 40 वर्षांची  कारकीर्द

शाहरुख खानने आपल्या 40 वर्षांच्या कारकि‍र्दीत 12 हजार 490 कोटी रुपयाचं साम्राज्य उभं केलं आहे. चित्रपट, जाहिराती, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि आयपीएल टीम अशा विविध मार्गांनी शाहरूखने ही संपत्ती जमवली आहे. किंग खानचं मुंबईत 200 कोटींचा 'मन्नत' बंगला, दुबई आणि लंडनमध्ये आलिशान घरे देखील आहेत. 2025 मध्ये अधिकृतपणे 'बिलियनेअर क्लब'मध्ये शाहरुखचा समावेश झाला.

Ashok Kharat

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

अशोक खरातची 15 वर्षांची 'काळी' कमाई 

शाहरुखला 12  हजार कोटींपर्यंत पोहोचायला 40 वर्षे लागली. पण अशोक खरातने केवळ 15 वर्षांत 15 हजार कोटींची माया जमवल्याचा धक्कादायक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. खरातने हा पैसा कमावण्यासाठी वापरलेला मार्गही तितचा वाईट होता.

  • अघोरी कृत्य: नकली साप, कापडी वाघ आणि तंत्र-मंत्राचा वापर करून भाविकांची फसवणूक.
  • महागडे मध आणि चिंचोके: 9 लाखांचे 'एल्विश मध' 15 लाखांना विकणे आणि स्वस्त चिंचोके पॉलिश करून 1 लाखांपर्यंत विकणे.
  • जमीन बळकावणे: सावकारीतून शेतकऱ्यांची लूट आणि धमकावून जमिनींची खरेदी.
  • बनावट रत्ने: दैवी शक्तीचा दावा करत नकली खडे आणि 'ओश्नो जल' हजारो रुपयांना विकणे.
Latest and Breaking News on NDTV

राजकीय पडसाद आणि कारवाई

या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली असून खरातची ही संपत्ती केवळ हिमनगाचे टोक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील इतर भागीदारांच्या चौकशीची मागणी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणासाठी एसआयटी (SIT) स्थापन केल्याचे सांगत सखोल तपासाचे आश्वासन दिले आहे.

आता ईडीची एन्ट्री

अशोक खरातच्या या अफाट संपत्तीचा स्रोत शोधण्यासाठी आता अंमलबजावणी संचालनालय (ED) मैदानात उतरले आहे. नाशिक, अहमदनगर आणि पुणे येथे ईडीने छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ईडी लवकरच अशोक खरातचा ताबा घेण्याची शक्यता असून त्याची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com