Auto-Rikshaw Protest: ई-बाईक टॅक्सीविरोधात आज मुंबईत आंदोलन; पुण्यातून 2000 चालकांचा सहभाग

ई-बाईकमुळे पारंपरिक रिक्षाचालकांचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. तसेच अॅपवर शासनाने निश्चित केलेले दर न दर्शवता जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

रेवती हिंगवे, पुणे

Auto Rikshaw Protest : राज्य सरकारकडून ई-बाईक टॅक्सीला दिलेल्या परवानगीविरोधात 'बघतोय रिक्षावाला' संघटनेच्यावतीने आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात पुण्यातून 500 कॅब्समधून दोन हजार चालक सहभागी होणार आहेत. तसेच राज्यातील इतर भागांतूनही टॅक्सीचालक मुंबईत आले आहेत. 

ई-बाईकमुळे पारंपरिक रिक्षाचालकांचे उत्पन्न घटण्याची भीती आहे. तसेच अॅपवर शासनाने निश्चित केलेले दर न दर्शवता जास्तीचे भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे. कंपन्यांना यापूर्वी निवेदने देऊनही दखल न घेतल्याने आता सरकारने कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे. या आंदोलनाला राज्यभरातील अनेक प्रमुख संघटना आणि कृती समित्यांचा पाठिंबा मिळाला आहे.

काय आहेत मागण्या?

  • ओला उबर रॅपिडोचे मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करा.
  • बाईक टॅक्सी कोणत्याही स्वरूपात नको. 
  • रिक्षा आणि कॅब परमिटवर मर्यादा आणा. 
  • रिक्षा टॅक्सी कल्याणकारी मंडळ कार्यन्वित करा.
Topics mentioned in this article