Bachchu Kadu : बच्चू कडूंना सहकार विभागाचा मोठा दणका, 5 वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यावर बंदी

गेल्या सात दिवसांपासून बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं होतं. 14 जून रोजी बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्याच्या दोन दिवसात बच्चू कडू यांना सहकार विभागाने मोठा दणका दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

प्रहारचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांना सहकार विभागाने मोठा दणका दिला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्यात आलं आहे. याचा परिणाम असा की, बच्चू कडूंना पुढील पाच वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यास सहकार विभागाने प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवता येणार नाही. 

नाशिकच्या न्यायालयाने बच्चू कडूंना एक वर्ष कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपविधीप्रमाणे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला बँकेच्या कोणत्याही पदावर राहता येत नाही. या नियमांचा संदर्भ देत बँकेतील विरोधी गटाने सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली होती. 

Advertisement

गेल्या सात दिवसांपासून बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं होतं. 14 जून रोजी बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्याच्या दोन दिवसात बच्चू कडू यांना सहकार विभागाने मोठा दणका दिला आहे. 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world