धक्कादायक ! बदलापूरच्या 'त्या' शाळेतील 15 दिवसांचं CCTV फुटेज गायब, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Badlapur School Case : बदलापूरमधील शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
D
मुंबई:

बदलापूरमधील शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेमधील गेल्या 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. बदलापूरातील शाळेत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण विभागानं विशेष समिती नेमली होती. या समितीच्या तपासात ही धक्कादायक माहिती पुढं आलीय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुणावर होणार कारवाई?

'बदलापूरच्या शाळेत ज्या मुलींवर अत्याचार झाला त्यांना रुग्णालयात तपासण्यास उशीर झाल्याचं त्यांच्या पालकांनी सांगितलं. त्याबाबतचा निर्णय आरोग्य विभाग घेईल. शिक्षण अधिकाऱ्यांनी घटना घडल्यानंतर वरिष्ठांना कळवणे गरजेचे होते. त्यांनी 20 तारखेला कळवले. शिक्षण अधिकाऱ्यांना कळवण्यात दिरंगाई केली. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे,' असं त्यांनी स्पष्ट केलं. 

लहान मुलींनी शैचास नेण्याची जबाबदारी दोन सेविकांवर होती. त्या  दोघी हजर असत्या तर ही घटना घडली नसती. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून सहआरोपी करावं असं आम्ही सांगितलं आहे. मुख्यध्यापिकांना 14 तारखेला या घटनेची माहिती होती. त्यांनी ते पोलिसांना कळवलं नाही. त्यांच्यावरही पोस्कोनुसार कारवाई करावी, अशी आम्ही शिफारस केली असल्याचं केसरकर म्हणाले. 

( नक्की वाचा : डोंबिवली हादरलं, रस्त्यावर अल्पवयीन मुली दिसताच त्यानं केलं भयंकर कृत्य! )
 

CCTV फुटेज गायब

सीसीटीव्ही लावणे हे आवश्यक आहे. या शाळेतील 15 दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग गायब आहे. त्याचीही चौकशी करत आहोत, असं केसरकर यांनी सांगितलं. शाळांमध्ये मदतकक्ष सुरु करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेत असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा केसरकर यांनी दिली. 

आम्ही फक्त वस्तूस्थिती तपासतोय आणि पोलिसांना पुढील तपासासाठी देत आहोत. अत्याचाराच्या घटनेतील मुलीला 10 लाखाची मदत केली जाईल. ज्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय तिला 3 लाखांची आणि प्रयत्न झालेला आहे तिला 3 लाखांची मदत करणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.  दोघींच्या शिक्षणाचा खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात दिली जाईल, मुलीची ओळखउघडकीस होणार नाही याची काळजी घेऊ, असं केसरकर यांनी यावेळी सांगितलं. 

Advertisement
Topics mentioned in this article