Badlapur - Karjat News : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील भार वाढल्यानंतर अनेक जण शेजारच्या ठाणे जिल्ह्यात राहण्यासाठी केले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. ठाणे जिल्ह्यातून लाखो नागरिक रोज लोकल तसंच एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईला ये-जा करतात. बदलापूर-कर्जत भागातील नागरिकांचाही यामध्ये समावेश आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर-कर्जतसाठी एक आनंदाची बातमी आहे. बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार करण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. या मार्गाच्या विस्ताराला परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) आभार मानले आहेत.
( नक्की वाचा : Shirdi News : शिर्डीतील 'त्या' लोकांवर बहिष्कार टाका! पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे थेट आदेश )
देवेंद्र फडणवीस यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'पीएम गतिशक्ती' अंतर्गत 'नेटवर्क प्लॅनिंग गटा'च्या '89व्या' बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला.
32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत यांसारख्या प्रवाश्यांच्या आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ अपेक्षित आहे.
हा पायाभूत प्रकल्प 'पीएमजीएस एनएमपी'च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, यामुळे विविध ठिकाणांदरम्यान जोडणी सुधारेल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार!