
सुनिल दवंगे, प्रतिनिधी
Shirdi News : साईनगरी शिर्डीमध्ये रोज लाखो भाविक येत असतात. साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून भाविकांची रिघ शिर्डीत सुरु असते. पण, याच भाविकांची फसवणूक झाल्याची घटना शिर्डीमध्ये उघड झाली होती. या प्रकरणात आहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनी एक आदेश दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
शिर्डीमध्ये शुक्रवारी (14 मार्च) सामान्य साईभक्तांना फुल आणि प्रसाद 900 रुपयांना घेण्यासाठी दमदाटी करण्यात आली. फुल भांडार दुकानदार तसंच एजंटांनी भाग पाडलं होतं. ही बाब शिर्डीकरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित दुकानदारांना जाब विचारला तसेच दोषी आढळल्याने शिर्डी नगरपरिषदनं तीन दुकाने सील केली.
या कारवाईच राजकारण केल जात असून काही व्यापा-यांकडून चक्क भाविकांची बाजू घेणा-या ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल करण्यात आले होते. पालकमंत्री विखे-पाटील यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकारे भाविकांची लूट करण्याचा ग्रामस्थांनीच बंदोबस्त करावा असं आवाहन त्यांनी केलं.
( नक्की वाचा : Shirdi News : साईबाबांच्या शिर्डीत भाविकांना लुटणारे दानव गजाआड! वाचा कशी होती चोरीची पद्धत )
या प्रकारच्या घटना घडल्यावर आपण नेहमीच कारवाई केली आहे. फुलांची विक्री ही साईबाबा संस्थानांच्या कर्मचाऱ्यांच्या सोसायटीमार्फतच विक्री व्हावी असा प्रयत्न आहे. अन्यत्र फुलं आपण घेऊ नये. आपण यावर कारवाई करु. स्थानिक नागरिकांनी देखील आपल्या गावाला बदनाम करणारे, साई भक्तांची लूट करणाऱ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.
शिर्डीत भाविकांना विकले जाणारे पेढे तसंच अन्य वस्तूंच्या विक्रीवर कुठेही एमआरपी दर नसतो, त्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न विखे यांना विचारण्यात आला त्यावर साई भक्तांचा आदर राखणे, त्यांच्यासाठी सर्व उत्तम व्यवस्था निर्माण करणे हे साईबाबा संस्थानचे तसंच या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझे कर्तव्य आहे, याबाबतच्या त्रुटी दूर केल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world