Crime News: बदलापूर हादरलं! मुलीच्या एका सवयीवरून वाद; नवऱ्याने बायकोला संपवलं

Crime News: बदलापूर पूर्वेतील यादवनगरमध्ये मुलीच्या वागणुकीवरून झालेल्या वादातून पतीने पत्नी अश्विनी थोरात यांची हत्या केली. बदलापूर पोलिसांनी आरोपी पती चंद्रकांत थोरातला अटक केली असून तपास सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Badlapur News: अल्पवयीन मुलगी रात्रीच्या वेळी घराबाहेर फिरते, यावरून झालेल्या वादात नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यावरून पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत होती. मंगळवारी रात्री या वादाने टोक गाठले. बदलापूर पूर्वेकडील यादवनगर परिसरातील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

वादाचे मूळ कारण आणि घटना

आरोपी चंद्रकांत थोरात आणि त्याची पत्नी अश्विनी थोरात यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक कलह सुरू होता. या दांपत्याला 17 वर्षांची एक मुलगी आहे. ती रात्रीच्या वेळी घराबाहेर का फिरते? यावरून चंद्रकांत हा पत्नी अश्विनीला जबाबदार धरत असे. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा याच कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. मुलगी झोपलेली असताना चंद्रकांतने रागाच्या भरात कमरेचा पट्टा काढला आणि अश्विनीचा गळा आवळला. यात अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement

(नक्की वाचा-  Nashik News: ज्योतिषी अशोक खरात बलात्काराच्या आरोपाखाली गजाआड; महिलांचे 58 VIDEO सापडल्याने खळबळ)

आरोपी नवऱ्याला अटक

घटनेची माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी चंद्रकांत थोरातला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला आज अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

(नक्की वाचा-  Viral Video: रीलसाठी टोकाचं पाऊल! बंगळुरुतील कुटुंबाचं कृत्य पाहून सारेच चक्रावले; पण...)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले की, "दोघांमध्ये मुलीच्या वागणुकीवरून वारंवार वाद होत होते. मंगळवारी रात्री झालेल्या वादातून पतीने टोकाचे पाऊल उचलले. आम्ही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे."
 

Topics mentioned in this article