Badlapur News: झाडाचे आंबे तोडले, 15 वर्षाच्या मुलाला पालकां समोरच बदडले! मारहाणीचा थरार CCTV मध्ये कैद

या मुलाने या आधी ही अनेक वेळा आंबे चोरले असल्याचं या दाम्पत्याने दावा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बदलापूर येथील आपटेवाडी परिसरात एका १५ वर्षीय मुलाला आंबे तोडल्यामुळे दाम्पत्याने अमानुषपणे मारहाण केली
  • मारहाणीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
  • जामदरे दाम्पत्याने मुलाला घरासमोर नेऊन पालकांसमोरही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बदलापूर:

अमजद खान 

केवळ झाडाचे आंबे तोडले या किरकोळ कारणावरून एका 15 वर्षीय मुलाला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही  खळबळजनक घटना बदलापूरमध्ये उघडकीस आली आहे. बदलापूर पूर्व परिसरातील आपटेवाडी येथे हा प्रकार घडला आहे. या संपूर्ण मारहाणीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आम्ही ही मारहाण का केली याचे स्पष्टी करण ही त्या दाम्पत्याने दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. 

नेमकी घटना काय?
बदलापूर शहराच्या आपटेवाडी येथे स्वानंद तरंग सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये  काही मुले क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता मुलांचा चेंडू शेजारील बंगल्याच्या आवारात गेला. तो चेंडू आणण्यासाठी एक १५ वर्षीय मुलगा गेला होता. या बंगल्याच्या आवारात आंब्याची झाडं होती. त्या झाडांवर आंबे लागले होते. त्यामुले ते आंबे तोडण्याचा मोह त्या मुलाला टाळता आला नाही. त्याने  तिथल्या झाडाचे काही आंबे तोडले. ही बाब बंगल्याचे मालक राजा जामदरे आणि त्यांच्या पत्नीला समजली. आंबे तोडल्यामुले त्यांचा संताप अनावर झाला. ते जाब विचारण्यासाठी सोसायटीमध्ये गेले. 

Advertisement

नक्की वाचा - Actor Vijay: तमिळनाडूचा नवा धुरंधर! विजयच्या 'विजया'ची 5 कारणं, कोणती आश्वासनं ठरली गेमचेंजर?

घरासमोर नेऊन मारहाण
जामदरे दाम्पत्य रात्रीच्या वेळी सोसायटीत गेलं. त्यांनी त्या संबंधित मुलाला जाब विचारला. ते येवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी त्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतक्यावरच न थांबता, त्यांनी मुलाला फरफटत त्याच्या घरासमोर नेले. त्यावेळी त्यामुलाचे पालक घरात होते. त्यांनी पालकांसमोरच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. "पुन्हा आंबे तोडले तर नग्न करून मारू," अशी धमकीही त्यांनी दिल्याचे मुलाच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

नक्की वाचा - Do You Know: जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्हाला माहित आहे का? उत्तर ऐकून थक्क व्हाल

पोलीस काय कारवाई करणार? 
"आम्ही इथले गाववाले आहोत, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही," अशा आविर्भावात त्यांनी धमकी दिल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटीच्या सीसीटीव्हीत ही सर्व घटना स्पष्टपणे दिसत आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, आरोपींना अद्याप बेड्या न ठोकल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान या मुलाने या आधी ही अनेक वेळा आंबे चोरले असल्याचं या दाम्पत्याने दावा केला आहे.