Badlapur News: व्यावसायिक सिलेंडर बंद, हॉटेल व्यावसायिक महिलेची भन्नाट आयडिया, हॉटेल बाहेरच लावली...

जर हॉटेल बंद असेल तर त्याचा फटका या लोकांना ही बसणार आहे. अशा स्थितीत ते कुठे जाणार. या गोष्टींचा विचार केल्याचं अनिता यांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे
  • बदलापुरातील हॉटेल व्यावसायिक अनिता अनुसे यांनी गॅस तुटवडीवर मात केली आहे
  • गॅस पुरवठा कमी झाल्याने हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय काही व्यावसायिकांनी घेतला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बदलापूर:

अमजद खान 

इराण इस्त्रायल अमेरिका उद्याचे पडसाद संपूर्ण जगात उमटत आहेत. पेट्रोल डिझेल सोबतच गॅसचा ही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.घरगुती गॅस सोबत हॉटेलला पुरवला जाणाऱ्या गॅसचा ही तुटवडा जाणवत आहे. गॅस मिळत नाही म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत हॉटेल मालकांचं नुकसान होत आहे. पण त्यावर अवलंबून असलेल्या कार्मचाऱ्यांचे ही नुकसान होत आहे. असा वेळी बदलापुरातल्या एका महिला हॉटेल व्यावसायिकाने यावर तोडगा शोधून काढला आहे. त्यातून हॉटेल ही सुरू राहील आणि कुणावर उपासमारीची ही वेळ येणार नाही याची सोय केली आहे.  

इराण-अमेरिका संघर्षाचे पडसाद आता नागरिकांच्या जीवनातही दिसू लागले आहेत. युद्धाचा थेट परिणाम आता एलपीजी पुरवठ्यावर होताना दिसत आहे. तर सरकारने हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे आता बदलापूर मधील एका हॉटेल व्यवसायिक महिलेने यावर उपाय शोधून काढला आहे. त्यांच्या हॉटेलवर अनेक जण अवलंबून आहेत. शिवाय हॉटेल बंद ठेवणे त्यांना ही परवडणारे नाही. त्यामुळे त्यांनी एक तोडगा काढत सर्वांनाच दिलासा दिला आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Latur News: वर्षभरात 189 अल्पवयीन मुली बेपत्ता, गायब होण्या मागचं धक्कादायक कारण आलं समोर, सर्वच हादरले

अनिता अनुसे असं त्याचं नाव आहे. त्यांचे बदलापूर इथं हॉटेल आहे. त्यांनी गॅस मिळत नाही म्हणून हॉटेल बाहेरच चूल मांडली आहे. तिथेच त्या चुलीवर अन्नपदार्थ करायला सुरुवात केली आहे. हॉटेल बंद केल्यास हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर  उपासमारीची वेळी येईल असं त्या म्हणाल्या. शिवाय रोज त्यांच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी तसेच नाश्त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात. जर हॉटेल बंद असेल तर त्याचा फटका या लोकांना ही बसणार आहे. अशा स्थितीत ते कुठे जाणार. या गोष्टींचा विचार केल्याचं अनिता यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Gas Shortage: LPGसाठी राज्य सरकारची नियमावली! कुणाला किती गॅस मिळणार? 'या' संस्थांना 100 टक्के पुरवठा

त्यामुळे चुलीवर जेवण आणि नाश्ता करण्याचा निर्णय घेतल्याचं त्या सांगितात. हॉटेल बंद ठेवणं ही आपल्याला परवडणारं नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे गॅसला चुल हा पर्याय आपण निवडला. त्यातून आता हॉटेल सुरू ही राहील आणि कुणाला फटका ही बसणार नाही असं त्या म्हणाल्या. त्या स्वत: चुलीवरचं जेवण बनवत आहेत. त्यामुळे गॅस शिवाय त्याचं सध्या तरी काही अडलेलं दिसत नाही. अनेक ठिकाणी गॅसमुळे हॉटेल व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. यावर तोडगा लवकर काढावा अशी मागणी होत आहे. 

Topics mentioned in this article