- लातूर जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान 189 अल्पवयीन मुली गायब झाल्याच्या तक्रारी आहेत
- पोलीस तपासात 171 मुलींचा शोध लावण्यात आला असून 19 मुलींचा शोध अद्याप सुरू आहे
- 18 वर्षांवरील 868 महिला बेपत्ता झाल्यापैकी 764 जणींचा शोध लागला असून 104 जणींचा शोध सुरू आहे
विष्णू बुरगे
मुली गायब होण्याच्या घटना राज्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. ही सर्वांनाच चिंतेत टाकणारी बाब आहे. मात्र त्याचा ओघ काही थांबता थांबेना अशी स्थिती झाली आहे. मुली बेपत्ता होतातच कशा याचा ही शोध पोलीसांनी घेतला आहे. त्यातून त्यांच्या समोर काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळे पालकांसह पोलीसांच्या पायाखालची ही वाळू सरकली आहे. एकच्या लातून जिल्ह्यातील मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी ही धक्कादायक आहे. मात्र पोलीसांनी राबवलेल्या विशेष मोहीमे अंतर्गत अनेक मुलींचा पत्ता लागला आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
लातूर जिल्ह्यातून जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत विविध 23 पोलीस ठाण्यांत मुली गायब झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे. जवळपास 189 मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्र फिरवली. मेहनतीने त्यांनी यापैकी जवळपास 171 मुलींचा शोध लावला. त्यात पोलिसांना यश आले आहे. या पैकी अजून ही 19 मुलींचा शोध सुरू आहे. हा आकडा सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे. हे झालं अल्पवयीन मुलींच. पण लग्न झालेल्या महिला किंवा विधावा महिला यांचा ही गायब होण्याचा आकडा समोर आला आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2025 अखेर 18 वर्षांवरील महिला अशा एकूण 868 जणी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 764 मुली व महिलांचा शोध लागला आहे. तर 104 जणींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये 189 मुली या अल्पवयीन आहेत. ज्या मुलींचा शोध घेण्यात आला. त्यातल्या अनेक मुली या हैदराबाद, मुंबई पुणे येथे गेल्या होत्या. त्यांना घेवून जाणाऱ्या तरुणांना याच शहरातून पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. अशा गायब झालेल्या मुलींना शोधण्यासाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आलं आहे. त्या पथकाला 90 ते 95 टक्के यश मिळतं असा दावा लातूरचे पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांनी केला आहे.
नक्की वाचा - Palghar News: नाकाबंदीत ट्रिपल सीट आले, मोठ्या गुन्ह्याचे बिंग फुटले, 'असा' लागला छडा
या मुली किंवा महिला का गायब होत आहेत या मुळाशी ही पोलीस पोहोचले आहेत. त्यात त्यांना धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मोबाईलच्या माध्यमातून तरूण मुली किंवा अल्पवयीन मुली या मुलांच्या संपर्कात आल्या. त्यातून त्या प्रेमाच्या जाळ्यात ओढळ्या गेल्या. नंतर पुढे त्यांना पुळून नेण्यात आले किंवा त्या अमिषाला बळी पडून पळून गेल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाचा यात मोठा हात आहे. थोडक्यात मोबाईल, सोशल मीडिया आणि प्रेम प्रकरणातून अनेक घटना घडल्या आहेत. तर महिला या कौटुंबिक वादातून घर सोडताना दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world