
निनाद करमरकर
अंधत्व निवारणाच्या मोहिमेत गेली 34 वर्ष काम साकीब गोरे हे काम करत आहेत. त्यांची ओळख बदलापुरातील व्हिजनमॅन म्हणून आहे. त्यांना यांनी आता जागतिक क्रांतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी आता अवघ्या 33 रुपयात चष्मा बनवला आहे. नेपाळच्या काठमांडूत होणाऱ्या जागतिक शिखर परिषदेत 'देवाभाऊ' नावाने हा चष्मा सादर केला जाणार आहे. या समिटमध्ये IAPB आणि WHO ने या चष्म्याची निवड केल्यास, अमेरिकेपासून 140 देशांमध्ये गोरगरीब गरजू लोकांना 33 रुपयांत म्हणजेच 0.38 डॉलर्समध्ये हा चष्मा उपलब्ध होईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
IAPB अर्थात जागतिक अंधत्व निवारण ही संस्था अंधत्व आणि दृष्टीदोष निवारणासाठी जागतिक स्तरावर काम करते. या संस्थेच्या माध्यमातून नेपाळच्या काठमांडूत 29 एप्रिल ते 1 मे असे तीन दिवस जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिखर परिषदेत 76 देशातील 700 नामांकित संस्था सहभागी होणार आहेत. यात बदलापुरातील व्हिजनफ्रेंड साकिब गोरे या संस्थेचाही समावेश आहे. साकिब गोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामातून प्रेरणा घेत त्यांच्या नावाने सर्वात स्वस्त, टिकाऊ आणि उपयुक्त अशा चष्म्यांची सीरिज बनवली आहे. 33 रुपयांपासून ते 260 रुपयांपर्यंतच्या या चष्म्यांमुळे जगात क्रांती घडेल, असा विश्वास साकिब गोरे यांनी व्यक्त केलाय.
सध्या जगभरातील 2.5 अब्ज लोक दृष्टीदोषाने त्रस्त आहेत. त्यापैकी 1.1 अब्ज लोकांपर्यंत अद्यापही चष्मा पोहोचू शकलेला नाही. चष्म्याची किंमत जास्त असल्यामुळे गोरगरीब लोकांवर चष्म्याअभावी अंधारात चाचपडण्याची वेळ आलीय. मात्र त्यांना अवघ्या 33 रुपयात 'देवाभाऊ' चष्मा मार्ग दाखवण्याचं काम करेल, असा विश्वास साकिब गोरे यांनी व्यक्त केलाय.
ट्रेडिंग बातमी - MHADA Lottery : मुंबईत म्हाडाच्या 5000 घरांसाठी दिवाळीत लॉटरी
काठमांडूत होत असलेल्या समिटमध्ये जगभरातल्या 700 संस्थांपैकी तीन संस्थाची सर्वात कमी दरातील चष्म्यांसाठी निवड करण्यात आलीय. त्यापैकीच एक व्हिजन फ्रेंड साकिब गोरे ही संस्था आहे. या तीन संस्थांमधून एका संस्थेची IAPB कडून अंतिम निवड केली जाणार आहे. त्यामुळे काठमांडूच्या समिटमध्ये सर्वात स्वस्त चष्मा म्हणून बदलापुरतील सामाजिक कार्यकर्ते साकिब गोरे यांच्या 'देवाभाऊ सीरिज' चष्म्यांची निवड होणार का? याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world