Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Badlapur News: शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि चतुरे यांच्या कुटुंबीयांनी या हल्ल्याचा थेट आरोप भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी म्हसकर यांच्यावर केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

बदलापूर शहरात राजकीय वर्चस्वाच्या वादातून शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हेमंत चतुरे यांच्यावरील हल्ल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून शिवसेना आणि भाजपमधील वाद आता विकोपाला पोहोचला आहे.

पूजेसाठी गेले असताना हल्ला 

ही घटना सायंकाळच्या सुमारास घडली. हेमंत चतुरे हे बदलापूर येथील एका सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पूजेच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून बाहेर येत असतानाच, त्या ठिकाणी भाजपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

(नक्की वाचा-  Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं! बस चालकाने मिनी बसमध्ये चिमुकलीवर केला अत्याचाराचा प्रयत्न)

'बंटी म्हसकर' यांच्यावर गंभीर आरोप

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि चतुरे यांच्या कुटुंबीयांनी या हल्ल्याचा थेट आरोप भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बंटी म्हसकर यांच्यावर केला आहे. बंटी म्हसकर हे भाजपच्या नगरसेविका हेमांगी म्हसकर यांचे पती आहेत. राजकीय द्वेषातूनच हा नियोजित हल्ला करण्यात आल्याचा दावा शिवसेना गटाकडून केला जात आहे.

(नक्की वाचा-  Crime News: पतीला क्रूरपणे संपवलं, नंतर मृतदेहाशेजारी पॉर्न पाहत बसली; प्रियकरासह पत्नीला अटक)

मारहाणीत जखमी झालेल्या हेमंत चतुरे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी बंटी म्हसकर आणि त्यांच्या 20-25 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
 

Advertisement