जाहिरात

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं! बस चालकाने मिनी बसमध्ये चिमुकलीवर केला अत्याचाराचा प्रयत्न

बदलापूरमध्ये पु्न्हा एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. मिनी बस चालकाने विद्यार्थीनीवर शाळेच्या मिनी बसमध्ये अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं! बस चालकाने मिनी बसमध्ये चिमुकलीवर केला अत्याचाराचा प्रयत्न
Badlapur Crime News
मुंबई:

अमजद खान, प्रतिनिधी

Badlapur Crime News Today : बदलापूरमध्ये पु्न्हा एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. मिनी बस चालकाने 4 वर्षांच्या शाळकरी मुलीवर शाळेच्या मिनी बसमध्ये अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. मिनी बस चालकाने विद्यार्थीनीवर शाळेच्या मिनी बसमध्ये अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता संगीता चेंडवरकर यांनी स्कूल व्हॅनची तोडफोड केली आहे. 

नक्की वाचा >> T20 World Cup 2026: भारतात न खेळण्याच्या निर्णयामुळे बांगलादेशला होणार मोठी शिक्षा? ICC कडे कोणते पर्याय? वाचा

"बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीनं केला आहे.त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे. ही घटना स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती फिर्यादीकडून मिळाली आहे", अशी माहिती एसीपी शैलेश काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com