Palghar Politics : पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का, माजी राज्यमंत्री शिंदे गटात सामील

ठाकरे गटातील इच्छुक उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव असल्याची चर्चा असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्यांना धक्का बसला आहे. त्यांना कोणत्या मतदारसंघात उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

मनोज सातवी, पालघर

पालघरमध्ये शिवसेना बहुजन विकास आघाडीला शिवसेना शिंदे गटाने धक्का दिला आहे. माजी राज्यमंत्री आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती मनीषा निमकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

मनीषा निमकर या पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. दोन टर्म आमदारकी भूषवलेल्या मनीषा निमकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळवण्यासाठी ठाकरे गटात चाचपणी देखील केली होती.

(नक्की वाचा - डोंबिवलीत ट्वीस्ट! शिंदेंचा मोहरा ठाकरेंच्या गळाला, भाजपचे टेन्शन वाढले?)

ठाकरे गटातील इच्छुक उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव असल्याची चर्चा असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्यांना धक्का बसला आहे. त्यांना कोणत्या मतदारसंघात उमेदवारी मिळते याकडे लक्ष लागले आहे.

(नक्की वाचा -  अजित पवारांना आणखी एक झटका लागणार? बडा नेता घर वापसीच्या तयारीत)

लोकसभा निवडणुकीआधी बहुजन विकास आघाडीच्या सफाळे येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना डोळे बंद होण्यापूर्वी मला आमदार करा, अशी इच्छा आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर त्यांनी व्यक्त केली होती. पक्षप्रवेशावेळी बोईसर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित असल्यामुळे मनीषा निमकर यांना बोईसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.