जाहिरात

अजित पवारांना आणखी एक झटका लागणार? बडा नेता घर वापसीच्या तयारीत

"मी शरद पवार यांना देव मानतो. तेवढंच अजितदादांनाही मानतो. अजितदादांमधील गुण आणि भविष्याचा विचार करुन आपण निर्णय घेतला. पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर आयुष्याचा केंद्रबिंदु आहे.

अजित पवारांना आणखी एक झटका लागणार? बडा नेता घर वापसीच्या तयारीत
सातारा:

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. यापूर्वी फलटणच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. फलटण येते त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले. यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार शरद पवार आणखी एक धक्का देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढचा निर्णय काय घ्यायचा? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांमधून 'तुतारी' साठी जल्लोष झाला. यावेळी बोलताना नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका केली. यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, मला काल काही जणांचा फोन आला. त्यांनी विचारलं तुम्ही अजितदादांना सोडून तिकडे चालले आहे का? मला काय बोलायचं हेच सुचेना. ही चर्चाच झाली नाही, ही चर्चा राज्यभर पसरली. 

ट्रेंडिंग बातमी - 9 महिन्याचा चिमुकला, गळ्याला साप चावला, 20 दिवस बेशुद्ध, नंतर जे झालं ते...

कदाचित आपल्याच विरोकांनी ही बातमी दिली असेल. मी तिकडे गेलो तर आपल्याला विधानसभेत कमळावर उभं राहता येईल असं त्यांना वाटत असेल, असा आरोपही नाईक निंबाळकर यांनी केला. आम्हाला काही प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत. मी कुठं जातोय याचा यांना काही फरक पडेल असं वाटत नाही. अजितदादांकडे जाण्याचा निर्णय पहिल्यांदा मी घेतला, असंही नाईक निंबाळकर म्हणाले. अजित पवार किती आक्रमक आहेत हे सगळ्यांना माहित आहे. अमित शाह यांनी जिल्हा बँकेच्या पंचाहत्तरीला येणार हे कबुल केले होते, पण कुठून फोन गेला आणि ते रद्द झाले. हे असं होणार असेल तर आम्ही कोणाला विचारायचं, असा सवालही रामराजे नाईक निंबाळकरांनी केला.

ट्रेंडिंग बातमी - डोंबिवलीत ट्वीस्ट! शिंदेंचा मोहरा ठाकरेंच्या गळाला, भाजपचे टेन्शन वाढले?

दरम्यान "मी शरद पवार यांना देव मानतो. तेवढंच अजितदादांनाही मानतो. अजितदादांमधील गुण आणि भविष्याचा विचार करुन आपण निर्णय घेतला. पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर आयुष्याचा केंद्रबिंदु आहे. केंद्रबिंदु जोपर्यंत सुरक्षित राहत नाही, तोपर्यंत गप्प राहाणार नाही.आपलं भाजपासोबत भांडण नाही, असंही रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. मात्र काही पर्यायच शिल्लक राहात नसेल तर काय करायचे असा  प्रश्नही त्यांनी केला. शरद पवारांनी आमदार नसताना आपल्याला मंत्री केले होते. अशा व्यक्तीची साथ आपण सोडली. आता कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जायचे असा सवाल ही त्यांनी यावेळी केला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com