Bank Holiday Bakrid 2026: जर तुम्ही या आठवड्यात बँकेत जाण्याचा विचार करत असाल आणि बँकिंगशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या आठवड्यात बकरीदचा (बकरी ईद) सण येत आहे. त्यामुळे बँकेच्या सुट्यांबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बकरीदनिमित्त बँका कधी बंद राहतील आणि कोणत्या दिवशी जाऊन काम पूर्ण करता येईल, हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. काही ठिकाणी 27 मे रोजी तर काही राज्यांमध्ये 28 मे रोजी सुटी असेल. तुमच्या शहरात यंदा बकरीदची सुटी 27 मे रोजी आहे की 28 मे रोजी? याबाबत या लेखाद्वारे सविस्तर माहिती जाणून घेऊया...
बकरीदनिमित्त 27 मे की 28 मे, बँका कधी बंद राहणार?
बकरीदच्या तारखेवरून यावेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी सुटी आहे. चंद्र दिसण्याची तारीख आणि स्थानिक परंपरांच्या आधारानुसार सुटीचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. 27 मे 2026 रोजी काही राज्यांमध्ये Eid al-Adha (Id-ul-Zuha) मुळे बँकांना सुटी असू शकते. तर देशाच्या अनेक भागांत 28 मे रोजी बकरीदची मुख्य सुटी असेल आणि बँका बंद राहू शकतात. पण आरबीआय (RBI) च्या कॅलेंडरनुसार बहुतांश राज्यांमध्ये एसबीआय (SBI) सह सर्व बँका 28 मे रोजी बंद राहतील.
याचा थेट अर्थ असा आहे की, जर तुम्ही बँकेच्या शाखेत काही महत्त्वाचे काम करण्यासाठी जात असाल, तर तुमच्या शहराच्या सुट्यांचे कॅलेंडर एकदा नक्की तपासून घ्या.
27 मे रोजी कुठे कुठे बँका बंद राहतील?
बुधवार 27 मे रोजी Eid al-Adha (Id-ul-Zuha) म्हणजेच बकरीदनिमित्त देशातील या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँका बंद राहतील.
- नवी दिल्ली
- उत्तर प्रदेश
- मध्य प्रदेश
- पंजाब
- हरियाणा
- बिहार
- उत्तराखंड
- पश्चिम बंगाल
- छत्तीसगड
- झारखंड
- हिमाचल प्रदेश
- तेलंगणा
- आंध्र प्रदेश
- आसाम
- त्रिपुरा
- मिझोरम
- मणिपूर
- नागालँड
- मेघालय
- केरळम
- जम्मू-काश्मीर
28 मे रोजी कुठे कुठे बँकांना सुटी असेल?
गुरुवार 28 मे रोजी बकरीदनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, गोवा आणि बिहार याया राज्यांमध्ये बँकांना सुटी असेल.
(नक्की वाचा: Why is Bakri Eid celebrated? : बकरी ईद का साजरी केली जाते? प्राण्यांची कुर्बानी देण्यामागे काय आहे कारण?)
बकरीदच्या सुटीबाबत संभ्रम का आहे?
खरं तर बकरीदची तारीख पूर्णपणे चंद्र दिसण्यावर अवलंबून असते. याच कारणामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि भागांमध्ये हा सण एक दिवस आधी किंवा एक दिवस उशीरा साजरा केला जाऊ शकतो. यामुळेच यावेळी अनेक ठिकाणी 27 मे आणि अनेक ठिकाणी 28 मे रोजी सुट्टी देण्यात आली आहे आणि लोकांना त्यांच्या भागात बँका कोणत्या दिवशी सुरू राहतील तसेच कोणत्या दिवशी बंद राहतील हे जाणून घ्यायचे आहे.
बकरीदव्यतिरिक्त आणखी कोणत्या दिवस बँका बंद राहू शकतात?
बकरीदव्यतिरिक्त या आठवड्यात वीकेंड (शनिवार-रविवार) आणि राज्यनिहाय सुट्यांमुळे बँकेशी संबंधित कामकाजावर परिणाम होऊ शकतो. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारशिवाय रविवारीही बँकेच्या शाखा बंद असतात. मे महिन्यात 30 तारखेला पाचवा शनिवार येत असल्याने, आरबीआयच्या नियमांनुसार या दिवशी सर्व बँका पूर्णपणे सुरू राहतील. बँका फक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीच बंद असतात. 31 मे रोजी रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.
त्यामुळे जर काही महत्त्वाचे काम असेल, जसे की चेक क्लिअरन्स, पासबुक अपडेट, ड्राफ्ट किंवा बँकेच्या शाखेला भेट देणे, तर आधी सुट्यांची यादी नक्की तपासून घ्या. यासोबतच वेळेत आपले काम पूर्ण करून घेणे केव्हाही सोयीचे ठरेल.
ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहील
दिलासादायक बाब म्हणजे बँकेची शाखा बंद असण्याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमची सर्व कामे अडकून पडतील. सुट्टीच्या दिवशीही डिजिटल सेवा पूर्णपणे कार्यरत असतात. म्हणजेच सुटीच्या दिवशीही तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, बॅलन्स चेक करण्यासाठी आणि ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी UPI, ATM, Net Banking आणि Mobile Banking चा वापर सहज करू शकता.