Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवड शहरात अनेक औद्योगिक कंपन्या असल्यामुळे कामानिमित्ताने एजंटमार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी शहरात वास्तव्य केल्याचं निदर्शनात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे , पिंपरी चिंचवड 

बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांना जामीन मिळाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात समोर आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांत 2023 साली दाखल झालेल्या गुन्ह्यातील बांगलादेशी आरोपींनी वकिलाच्या सहाय्याने बनावट जामीनदार आणि बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून जामीन मिळवल्याचा समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी या तीनही आरोपीचा शोध घेतला असता ते पुण्यातून बेपत्ता झाले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांत दहशतवाद विरोधी शाखेचे हवालदार दत्तात्रय भागूजी निकम यांनी फिर्याद दिली. त्यानुसार  आरोपी सम्राट बलाय बाला, दोन महिला आरोपी, आरोपीचा वकील, बनावट जामीनदार, बनावट कागदपत्रे बनवणारा व्यक्ती अशा सहा जणांच्या विरोधात न्यायालय आणि पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(नक्की वाचा- Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार)

पिंपरी चिंचवड शहरात अनेक औद्योगिक कंपन्या असल्यामुळे कामानिमित्ताने एजंटमार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी शहरात वास्तव्य केल्याचं निदर्शनात आले होते. दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी अनेक बांगलादेशी नागरिकांचे पासपोर्ट आणि अन्य  बनावट कागदपत्रेही रद्द केली होती. शहरात बेकादेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. 

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)

अशाच एका दाखल गुन्ह्यातील आरोपींनी कारागृहात असताना वकिलाच्या मदतीने खोटे जामीनदार आणि खोटे कागदपत्रे तयार करून प्रथम न्यायदंडाधिकारी पिंपरी न्यायालय यांच्यासमोर सादर करून जामीन मिळवला. मात्र त्यानंतर पुन्हा हे बांगलादेशी नागरिक न्यायालयात हजर झाले नाही किंवा ते त्यांच्या दिलेल्या पत्त्यावर सापडले नाहीत. हे उघडकीस आल्यानंतर अखेर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता भोसरी एमआयडीसी पोलीस, दहशतवाद विरोधी शाखा त्यांचा शोध घेत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article