Pune News: बँक ऑफ महाराष्ट्रचा बाणेर करार, प्रत्यक्ष भाडे 1100 कोटी नाहीतर 406 कोटी, बँकेकडून खुलासा

Pune Bank Of Maharashtra News: बँक ऑफ महाराष्ट्रने बाणेर येथील 'मॉन्टक्लेअर' प्रकल्पात कार्यालयीन जागा भाड्याने घेण्याबाबत पसरलेल्या अफवांचे खंडन केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News: बँक ऑफ महाराष्ट्रने बाणेर येथील 'मॉन्टक्लेअर' प्रकल्पात घेतलेल्या जागेवरून रंगलेल्या वादावर बँकेने खुलासा केला आहे. हा व्यवहार 15 वर्षांसाठी 1100 कोटींचा असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र बँकेने आता अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, 15 वर्षांचा एकूण भाडे खर्च कर वगळून केवळ 406 कोटी इतकाच आहे.

करारातील मुख्य बाबी

बँकेने आपली बाजू मांडताना व्यवहारातील पारदर्शकता आणि व्यावसायिक गरजांवर प्रकाश टाकला आहे. बँकेने 1.16 लाख चौरस फूट कार्पेट एरिया भाड्याने घेतला आहे त्याचे. मासिक भाडे 1.77 कोटी आहे. 15 वर्षांचा करार असला तरी, बँकेला कोणत्याही क्षणी 3 महिन्यांच्या नोटीसवर हा करार समाप्त करण्याची मुभा आहे. तसेच, कोणताही 'लॉक-इन' कालावधी यासाठी नाही. याशिवाय दर 5 वर्षांनी 25 टक्के भाडे वाढीची तरतूद यात आहे.

Advertisement

जागा घेण्यामागील व्यावसायिक कारणे

बँकेने गेल्या काही वर्षांत 4000 हून अधिक नवीन कर्मचारी नियुक्त केले आहेत. शिवाजीनगर येथील 'लोकमंगल' मुख्यालय 40 वर्षे जुने असून तिथे विस्ताराला वाव नाही. बाणेरमधील जागा 'प्लग-अँड-प्ले' असल्याने बँकेला अंतर्गत सजावटीवर कोणताही भांडवली खर्च करावा लागलेला नाही. शिवाजीनगर येथील मुख्यालय बंद होणार नसून, ते पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहणार आहे. लोकमत टाईम्स याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे

बँकेने ही जागा घेताना पूर्ण पारदर्शकता पाळल्याचे नमूद केले आहे. दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जागेची संयुक्त मोजणी करण्यात आली असून, स्वतंत्र आर्किटेक्ट्स नियुक्त करून घेण्यात आले आहे. हे भाडे दर बाणेर परिसरातील 'ग्रेड-ए' व्यावसायिक मालमत्तेच्या प्रचलित दरांशी सुसंगत असल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.
 

Topics mentioned in this article