Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसला टोला;बारामतीबाबत म्हणाले... कल्याणमधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Baramati Bypoll 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बारामती लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा रंगली असून यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Baramati Bypoll 2026: खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
कल्याण:

Baramati Bypoll 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बारामती लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा रंगली असून यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. बारामतीची ही निवडणूक खरं तर बिनविरोध व्हायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्रातील राजकीय परंपरेचा हवाला देत त्यांनी विरोधकांच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बारामतीची निवडणूक आणि राजकीय परंपरा

बारामती लोकसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात काही विशिष्ट परिस्थितीत निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने उमेदवार का दिला, हे त्यांनाच जाऊन विचारले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Advertisement

( नक्की वाचा : Baramati Assembly: बारामतीच्या मैदानात 53 उमेदवार! सुनेत्रा पवारांसमोर अपक्षांची मोठी फौज; पाहा ए टू झेड यादी )

कल्याणमध्ये पक्ष बांधणीचा आढावा

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची आढावा बैठक घेतली. या बैठकीला खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना नेते रवींद्र फाटक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रामुख्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील पक्ष संघटनात्मक बांधणी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी ग्राऊंड लेव्हलवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीत केवळ राजकीय विषयांवरच नाही, तर तांत्रिक आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. एसआयआर (SIR) संदर्भात मॅपिंग व्यवस्थित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी फॅमिली मॅपिंग करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कार्यकर्त्याने मतदारसंघात जाऊन मतदारांना याचे महत्त्व पटवून द्यावे आणि मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग निश्चित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

( नक्की वाचा : Eknath Shinde : शिदेंच्या रडारवर'ते' पदाधिकारी! 11 तारखेपासून महाराष्ट्र दौरा; शिवसेनेत होणार मोठे फेरबदल )

कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

संघटनात्मक बांधणीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकांचे सत्र शिवसेनेकडून सुरू करण्यात आले आहे. या बैठकीत सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळातील निवडणुका पाहता प्रत्येक बुथ स्तरावर पक्ष कसा मजबूत करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदारांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवणे आणि शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, हेच कार्यकर्त्यांचे मुख्य काम असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
 

Topics mentioned in this article