Baramati Assembly Bypoll 2026: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी आता पोटनिवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या फेरबदलानंतर आणि अजितदादांच्या अनपेक्षित जाण्यानंतर होत असलेली ही निवडणूक राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत कळीची ठरणार आहे.
या जागेवर आपली पकड कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने आकाश विजयराव मोरे यांचं आव्हान. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झालेले सर्व प्रयत्न अखेर फोल ठरले असून बारामतीकर आता कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैध उमेदवारांची यादी जाहीर
निवडणूक आयोगाने अर्जांच्या छाननीनंतर वैध उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली असून यामध्ये एकूण 53 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे या मुख्य लढतीव्यतिरिक्त अनेक नोंदणीकृत पक्ष आणि तब्बल 46 अपक्ष उमेदवारांनी शड्डू ठोकल्याने बारामतीची निवडणूक चुरशीची होणार आहे.
( नक्की वाचा : Parth Pawar: पार्थ पवारांना स्वकीयांनीच घेरलं; आई सुनेत्रा पवार नव्या चक्रव्युहातून मुलाला कसं बाहेर काढणार? )
येत्या 23 एप्रिल रोजी या मतदारसंघासाठी मतदान पार पडणार असून या निवडणुकीचा निकाल बारामतीच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा असेल. प्रशासनाकडून निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून उमेदवारांनी आता प्रचाराचा धडाका लावला आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणूक 2026 साठी निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांचे पक्ष खालीलप्रमाणे आहेत:
राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार
आकाश विजयराव मोरे: इंडियन नॅशनल काँग्रेस
सुनेत्रा अजित पवार: नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार
अरुण भाऊराव निटुरे: राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
दशरथ नाना राऊत: भारतीय प्रजा सुराज्य पक्ष
प्रतिक्षा प्रशांत चव्हाण: आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी
राघु येताळा घुटूकडे: न्यू राष्ट्रीय समाज पार्टी
सतीश कृष्णा कदम: हिंदुस्तान जनता पार्टी
अपक्ष उमेदवार
अनिल दशरथ तुपे
रझाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी
अभिजीत महादेव कांबळे
अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले
अमोल यशवंत कोकरे
अविनाश वामनराव गायकवाड
अशोक रामचंद्र खामगळ
उन्मेश गणपतराव देशमुख
उमेश महादेव म्हेत्रे
करुणा धनंजय मुंडे
कांबळे त्रिशला मिलिंद
खिझर पिरजादे
गजानन उत्तम गवळी
गावडे संकेत बाळासाहेब
गोपाल यशवंतराव तंतरपाळे
चंद्रकांत रंभाजी मोटे
चंद्रकांत सुर्यकांत वाघमोडे
त्रिभुवन मधुकर पद्माकर
दत्तात्रय रावसाहेब बेदरे
दादा एकनाथ थोरात
दिनकर धारोजी गायकवाड
दिलीप प्रभाकर अळोणी
बाळासो मारुती धापटे
महेंद्र अशोक ताटे
माऊली जमादार कांबळे
मिथुन सोपानराव आटोळे
मोहन विष्णू राऊत
मंगलदास निकाळजे
योगेश मोहनदास रतेश्वर
राहुल बाळासो थोरात
रोहित राजु भोसले
विक्रम भरत कोकरे
विजयकुमार रामचंद्र भिसे
विराज महादेव शिंदे
विलास बाबुराव होळकर
विशाल दिलीप घोरपडे
शिवाजी जयसिंग कोकरे
सतीश नाना सोनावणे
सागर शरद भिसे
साजन भगवान आडसुळ
सिताराम विठठल रणदिवे
सिद्धाराम सोमण्णा काकणकी
सुवर्णा सुधाकर गायकवाड
सोनाली सूर्यकांत राणे
संतोष पोपटराव कांबळे
संदिप जनार्दन खरात
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world