'बीडीडी झाँकी है, मुंबई अभी बाकी है; वर्षभरात मुंबई खड्डेमुक्त करणार'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबईकर उपनगरात जाऊन स्थिरावत आहे. मात्र त्यांना पुन्हा मुंबईत आणायचं आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. - एकनाथ शिंदे.

जाहिरात
Read Time: 2 mins

म्हाडा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याअंतर्गत वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र रहिवाशांना आज 556 पुनर्वसन सदनिकांच्या चावींचं वितरण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सदनिकाधारकांना चावीवाटप केलं.  

म्हाडाच्या बीडीडी चाल पुनर्विकास सदनधारकांचा चावी वाटप सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. घराची चावी मिळालेल्या सर्व बीडीडी रहिवाशांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनाही शुभेच्छा द्यायला ते विसरले नाही. ते पुढे म्हणाले, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरासारखं घर असावं.. नको नुसत्या भिंती. आज तुमच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस आहे. बीडीडीच्या चाळीतून उभ्या राहिलेल्या इमारतीचं बांधकाम अत्यंत गुणवत्तापूर्वक आहे. यासाठी मी टाटांचं अभिनंदन करतो. म्हाडाची पूर्वीची घरं आणि आताची यात खूप फरक आहे. गुणवत्ता वाढली आहे. इतर बांधकाम क्षेत्रातील लोकांनी इथं येऊन बांधकाम कसं करावं हे पाहायला हवं असंही ते यावेळी म्हणाले. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Mumbai News :'बीडीडी चाळींप्रमाणे धारावीचे स्वप्न महायुती सरकारच पूर्ण करणार', अजित पवारांंचं मोठं आश्वासन

तीन ते चार पिढ्यांपासून बीडीडी चाळीतील लोक घराचं स्वप्न पाहत होते. 10 जणं एकाच छोट्याशा घरात राहत होते. त्यांना आता दिलासा मिळाला आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नाही इतर राज्यातील लोकही इथं राहतात.  देशभरातील लोक बीडीडी चाळीत राहतात. नव्याने बांधलेल्या घरातील प्रत्येक कोपऱ्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यात आला आहे.मोडकळीस आलेल्या या चाळीतून तुम्ही मोठ्या टॉवरमध्ये जाताय. हा आनंदाचा दिवस आहे. महायुती सरकार म्हणून काम करताना आम्ही टीम म्हणून काम करतो. विकास हाच आमचा अजेंडा आहे. मुंबईतील रस्ते, पुढील एक ते दीड वर्षात मुंबईत एकही खड्डा मिळणार नाही. खड्डे मुक्त मुंबई करणार. बीडीडी झाँकी है, मुंबई अभी बाकी है, वर्षभरात मुंबई खड्डेमुक्त करणार. त्याच दुप्पट मनुष्यबळ लावून वेळेच्या आधी पूर्ण केलं. मेट्रोचं कामही जलदगतीने सुरू आहे. 

Advertisement

मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा आणायचंय...
मुंबईकर उपनगरात जाऊन स्थिरावत आहे. मात्र त्यांना पुन्हा मुंबईत आणायचं आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. उपनगरात स्थायिक झालेल्या मुंबईकरांसाठी बीबीडी पुनर्विकास हे योग्य उदाहरण आहे.  

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली बीबीडी सदनिकांची खास वैशिष्ट्ये

किती वर्षे मेटेनन्स नाही?
12 वर्षे 

बांधकाम किती वर्षे टिकेल?
100 वर्षे 

सध्याची किंमत किती?
2 कोटींच्या घरात

किती चाळींचा विकास?
207

आधीचं घर किती स्क्वेअर फुट?
160

आताचं घर किती स्क्वेअर फुटाचं?
500

किती मजल्याचे टॉवर?
40 

किती सदनिका तयार?
556 

किती एकरवर टॉवर?
86 एकर 

एकूण किती रहिवाशी?
15 हजार 593 

किती चाळींचं पुनर्वसन?
3

कोणत्या ठिकाणी टॉवर?
परळ, वरळी, नायगाव