Bhiwandi News: कॅन्सरग्रस्त पत्नीला हुंड्यासाठी त्रास; घराबाहेर अघोरी कृत्याने परिसरात खळबळ, 6 जणांवर गुन्हा

पीडिता आपल्या माहेरी भिवंडीत राहण्यास आली असता, 22 जानेवारी 2026 रोजी पतीने तिच्या घराच्या दरवाजासमोर कापलेले लिंबू आणि कुंकू, काळ्या रंगाची बाहुली, अघोरी पूजेचे साहित्य टाकून तिला जीवे मारण्यासाठी जादूटोणा केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

भुपेंद्र आंबवणे, भिवंडी

भिवंडीत माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराने मृत्यूशी झुंज देणाऱ्या पत्नीला आधार देण्याऐवजी, हुंड्यासाठी तिचा छळ करून चक्क घराबाहेर जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अघोरी कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. निजामपूर पोलिसांनी पतीसह सासरच्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय पीडित महिला सध्या चौथ्या टप्प्यातील कर्करोगाशी झुंज देत असताना, तिच्या पतीने तिला आधार देण्याऐवजी तिला मरणाच्या दारात लोटण्यासाठी घरासमोर काळी जादू (Black Magic) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

2015 पासून सुरू होता छळ

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2015 मध्ये लग्न झाल्यापासून सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला होता. प्रत्येक अमावस्येला पीडितेच्या सासरी काळ्या जादूची पूजा मांडली जात असे आणि तिला 'अपशकुनी' ठरवून त्रास दिला जात होता.

(नक्की वाचा- Solapur News: भाजपला रोखण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र; दोन्ही राष्ट्रवादीही सोबत)

आजारपणात घराबाहेर हाकलले

सप्टेंबर 2025 मध्ये पीडितेला कर्करोग झाल्याचे निदान झाले. अशा कठीण प्रसंगी पतीने तिची काळजी घेण्याऐवजी 7 डिसेंबर 2025 रोजी तिला लहान मुलासह घरातून हाकलून दिले. पीडिता आपल्या माहेरी भिवंडीत राहण्यास आली असता, 22 जानेवारी 2026 रोजी पतीने तिच्या घराच्या दरवाजासमोर कापलेले लिंबू आणि कुंकू, काळ्या रंगाची बाहुली, अघोरी पूजेचे साहित्य टाकून तिला जीवे मारण्यासाठी जादूटोणा केला.

Advertisement

सासरच्या 'या' 6 जणांवर गुन्हा दाखल

पीडित मीनाक्षी केशरवानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी योगेशकुमार केशरवानी (पती), ओमकारनाथ केशरवानी (सासरा), चंद्रावती केशरवानी (सासू), भावना मल्होत्रा (नणंद) अनुराधा अरोरा (नणंद), श्रद्धा बोबडे (नणंद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(नक्की वाचा-  Rain Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट! 26 जानेवारीपर्यंत 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत)

पोलिसांची कारवाई

निजामपूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85, 115(2), 127 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा* कलम ३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपायुक्त (DCP) शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article