जाहिरात

Dombivli News: डोंबिवलीच्या 'या' मुख्य रस्त्यांची चाळण, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांना होतोय प्रचंड त्रास

कल्याणनंतर आता डोंबिवलीतील रस्त्यांचीही चाळण झाल्याचं समोर आलं आहे. डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन परिसरातून गणेशनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे.

Dombivli News: डोंबिवलीच्या 'या' मुख्य रस्त्यांची चाळण, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिकांना होतोय प्रचंड त्रास
Potholes On Dombivli Roads

Potholes On Dombivli Roads : कल्याणनंतर आता डोंबिवलीतील रस्त्यांचीही चाळण झाल्याचं समोर आलं आहे. डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन परिसरातून गणेशनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे.यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.पावसाळा उलटला तरीही खड्डे बुजवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत,असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पादचाऱ्यांचीही होतेय खूप मोठी गैरसोय

डोंबिवली पश्चिमच्या स्टेशन परिसरातून परिसरातून गणेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोकाही वाढला आहे. एकीकडे वाहनांची गर्दी, तर दुसरीकडे खड्ड्यांमधून मार्ग काढताना पादचाऱ्यांचीही खूप गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

नक्की वाचा >>'मी फक्त 15 वर्षांची आहे, मला माफ करा!' PM मोदींविरोधात अपशब्द वापरणाऱ्या मुलीचा माफीनामा VIDEO VIRAL

अद्यापही पालिकेकडून उपाययोजना करण्यात आल्या नाहीत

शाळकरी मुले,ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या रस्त्यावरून नेहमीच प्रवास करतात. परंतु, खड्ड्यांमुळे त्यांना येजा करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्याआधी आणि नंतर रस्त्यांच्या दुरूस्तीची कामे केली जातात. परंतु, यंदा पावसाळ्याचा अर्धा हंगाम संपत आला, तरी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना करण्यात आली नाही. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com