Pune News: सिंहगड किल्ल्यावरून खाली येताना दोन पर्यटकांसोबत भयंकर घडलं, चार पथक घटनास्थळी पोहोचले अन्..

पुण्यात सिंहगड घाटात एक भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकी दरीत कोसळून भीषण अपघात झाला.या अपघातात एक तरुण आणि तरूणी गंभीर जखमी झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bike Accident On Sinhagad Ghat Road Pune
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी 

Pune Accident News Today : पुण्यात सिंहगड घाटात एक भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकी दरीत कोसळून भीषण अपघात झाला.या अपघातात एक तरुण आणि तरूणी गंभीर जखमी झाली.पूजा चव्हाण आणि सौरव पासलकर अशी जखमी झालेल्या दोन पर्यटकांची नावं आहेत.सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील 11 हजार पॉईंट परिसरातून दुचाकी थेट खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.सिंहगड किल्ल्यावरून खाली येताना चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्देवी घटना घडली.

चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि..

मिळालेल्या माहितीनुसार,सिंहगड घाटातून तरुण-तरुणी दुचाकीवरून प्रवास करत होते.त्यावेळी चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट दरीत कोसळली. सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील 11 हजार पॉईंट परिसरातून दुचाकी थेट खोल दरीत पडली.या अपघाताची माहिती मिळताचं.वनविभाग,वन समितीचे कर्मचारी,स्थानिक नागरिक, पर्यटक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement

नक्की वाचा >> Hingoli News: हिंगोलीत खळबळ! महिलेच्या अंत्यविधीनंतर अस्थी झाल्या गायब, त्या गावात अमावसेच्या रात्री काय घडलं?

जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढलं

या पथकाच्या अथक प्रयत्नानंतर जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.या अपघातात पूजा चव्हाणच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पायाच्या इतर भागालाही फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आलीय.तर तरुण सौरव पासलकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

नक्की वाचा >> Trending Video: 'ती' वंदे भारत ट्रेनमध्ये पहिल्यांदाच गेली अन् व्हिडीओ बनवायची वेळ आली, सर्वच झाले थक्क