राहुल तपासे, प्रतिनिधी
Pratapgad Couple Accident News : सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ला परिसरातील घाटरस्त्यावर आज गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.मोटारसायकलचा ताबा सुटून ती थेट कठड्याला धडकली आणि जवळपास 800 ते 900 फूट खोल दरीत कोसळली. मृतांमध्ये मोहन चव्हाण आणि त्यांची पत्नी राजश्री चव्हाण (रा.वाई) यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे दाम्पत्य दुचाकीवरून फिरस्ता व्यवसाय करत असल्याचेही समजते.
पथकांनी दरीत उतरून शोधमोहीम राबवली
मिळालेल्या माहितीनुसार,चव्हाण दांपत्य प्रतापगड घाट मार्गे किल्ल्याकडे निघाले होते.घाटातील तीव्र वळणावर दुचाकी क्र.एमएच 11 सी एल 8287 चालकाचा ताबा सुटल्याने वाहन कठड्याला धडकले आणि थेट दरीत कोसळले.अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
नक्की वाचा >> Pune News: भीमाशंकर मंदिर बंद, तरीही स्वामी नलिनानंद गिरी महाराज मंदिरात घुसले, धमक्या दिल्या अन्..
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके,महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली.मुसळधार पावसात आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीतही या पथकांनी दरीत उतरून शोधमोहीम राबवली.त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर मृतदेह वर काढण्यात आले.ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
प्राथमिक अंदाजानुसार,घाटातील धोकादायक वळणे,वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे ही अपघाताची संभाव्य कारणे मानली जात आहेत.मात्र,नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे प्रतापगड घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.स्थानिक प्रशासनाने वाहनचालकांना विशेषतः घाटरस्त्यांवर वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्याचं ILS लॉ कॉलेज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, शेकडो विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट, प्रकरण काय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world