Pune News: पुण्यात डॉक्टर तरुणीने संपवलं आयुष्य, सुसाईड नोट वाचून कुटुंबीयांचा अश्रूंचा बांध फुटला

. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ती गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक समस्यांनी त्रस्त होती. तिचे मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरू होते आणि ती नियमित औषधे घेत होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे

Pune News: पुण्यात बीजे मेडिकल कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 21 वर्षांची ही विद्यार्थिनी तिच्या हॉस्टेलसमोरील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, अशी माहिती बंडगार्डन पोलिसांनी दिली आहे.

घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात "मला अभ्यास करायचा आहे, पण मी करू शकत नाही. मला माफ करा," असे लिहिलेले आहे. सुसाईड नोट वाचून कुटुंबीयांचा अश्रूंचा बांध फुटला. 

(नक्की वाचा- Navi Mumbai: डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 5 रुग्णांनी गमावली दृष्टी; बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल)

मूळची राजस्थानची असलेली ही विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षणासाठी पुण्यात राहत होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ती गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक समस्यांनी त्रस्त होती. तिचे मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरू होते आणि ती नियमित औषधे घेत होती.

(नक्की वाचा-  Nashik News: नाशिक हळहळलं! सहावीतील मुलीचा हार्ट अटॅकने मृ्त्यू, शाळेत जाताना चक्कर आली अन्...)

विद्यार्थीनी आठवीत असल्यापासून मानसिक आजाराशी संघर्ष करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. ही घटना पुन्हा अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. बीजे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Topics mentioned in this article