
Navi Mumbai News : नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पाच रुग्णांची दृष्टी गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाशी येथील रुग्णालयातील दोन नेत्ररोग तज्ज्ञांविरोधात वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप ठेवून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
या प्रकरणाची सुरुवात एका 67 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केल्यावर झाली. या तक्रारीसोबत ठाण्याच्या सिव्हिल सर्जनने दिलेला एक अहवाल जोडण्यात आला होता. ज्यात वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉ. चंदन पंडित आणि डॉ. डी. व्ही. पंडित या दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
(नक्की वाचा- Hindustani Bhau VIDEO: माधुरी हत्तीणवरुन हिंदुस्थानी भाऊची शिवीगाळ, ठाकरे गटाचा कोल्हापुरी पायतणाने चोपण्याचा इशारा)
तक्रारदारीतील म्हणण्यानुसार, डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत आणखी चार लोकांवरही याच रुग्णालयात अशाच प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. या सर्व रुग्णांनी आपली दृष्टी गमावल्याचे म्हटले आहे. रुग्णांनी असा दावा केला आहे की, या रुग्णालयात झालेल्या ऑपरेशननंतर त्यांना 'स्यूडोमोनास' नावाच्या बॅक्टेरियामुळे संसर्ग झाला आणि त्यामुळे त्यांची दृष्टी गेली.
वाशी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "आरोपी डॉक्टरांनी अत्यंत निष्काळजीपणाने आणि घाईगडबडीत शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे. त्यामुळे 65 वर्षांवरील एका व्यक्तीसह पाच रुग्णांना डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. या डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा परवाना त्या कालावधीत रिन्यू केलेला नव्हता, असाही आरोप पोलिसांनी केला आहे.
Cloud burst video: संपूर्ण गावाला नदीनं गिळलं, ढगफुटीची दृश्य पाहून काळीज थरथरलं, पाहा Video
या गंभीर आरोपांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, पुढील कार्यवाही लवकरच केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे रुग्णालयांमधील शस्त्रक्रियेदरम्यानच्या स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या मानकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world